
जळगाव ग्रामीण युवा वॉरीअर्सची यावल शहर शाखा सुरू
यावल (सुरेश पाटील). शुक्रवार रोजीभाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी,सचिव मा.अनिकेतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथे भाजपा युवा मोर्चा च्या 18 ते 25 वयोगटातील युवांची युवा वारीयर्स शाखेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.कुंदनदादा फेगडे यांच्या हस्ते फलक अनावरण झाले,त्याप्रसंगी उपस्थित डॉ. कुंदनदादा फेगडे,भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष सागर कोळी,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष योगेश खेवलकर,यावल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रितेश बारी,भूषण फेगडे, भाजपा सरचिटणीस स्नेहल फिरके, शाखा अध्यक्ष -अविनाश बारी,उज्वल कानडे,संजय फेगडे, हेमंत फेगडे,कोमल इंगळे,सागर इंगळे,प्रथमेश घोडके,सागर लोहार, देवेंद्र फेगडे,अक्षय चौधरी,भूषण धोत्रे,दिनेश माळी,जय वानखेडे,राहुल पाटील,केतन चोपडे,सागर लोखंडे, आरिफ तडवी आदी उपस्थित होते.