औरंगाबादेत शिवजंयती मिरवणुकीत तरूणाची हत्या

Featured महाराष्ट्र
Share This:

औरंगाबादेत शिवजंयती मिरवणुकीत तरूणाची हत्या

औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि ): शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घुण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना हनुमाननगर चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावरील नागापुरकर दवाखान्यासमोर घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली. या पथकाने एका आरोपीला अटक केले असून दुसरा आरोपी अद्यप फरार आहे.

श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय 21, रा . हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर), असे मृताचे नाव आहे. श्रीकांत हा शहरातील एका महाविद्यालयात बी.ए. चे शिक्षण घेत होता. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी तो मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. हनुमाननगरकडून पुंडलिकनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणार्‍या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. तेथील नागापुरकर हॉस्पिटलसमोर अनोळखी तरुणांसोबत त्याचे भांडण झाले. यावेळी मिरवणुकीतील तरुण डी. जे. च्या तालावर नाचत असताना आरोपीने अचानक श्रीकांतच्या छातीत चाकू खुपसल . या घटनेत श्रीकांत खाली कोसळताच मारेकरी तेथून पसार झाले. या घटनेची माहिती सोबतच्या मित्रांनी त्याच्या घरी कळविली. यानंतर त्याच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन श्रीकांतला बेशुद्धावस्थेत एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रात्री 8.50 वाजता श्रीकांतला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे , उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळ , बाळाराम चौरे आणि इतरांनी घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी श्रीकांतचे शव घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी मृताचा भाऊ सूरज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांसह अधिका-यांची घटनास्थळी धाव 
शिवजयंती मिरवणुकीत तरुणाची हत्या झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी, कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मारेकर्‍याला पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने चार पथके रवाना करण्यात आली. यात गुन्हे शाखेची दोन पथके आहेत.
एका आरोपीस अटक, एक फरार दरम्यान  श्रीकांतच्या मारेकर्‍यांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले आहे. विजय शिवाजी वैद्य असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आह. तर, राहुल सिद्धेश्वर भोसले असे फरार आरोपीचे नाव आहे. पोलिसांची चार पथके या आरोपीचा कसून शोध घेत आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *