
यावल: बोरावल गेट भागात दुकानातून झेरॉक्स मशीन चोरी
बोरावल गेट भागात दुकानातून झेरॉक्स मशीन चोरी.
मोठी वर्दळ असलेल्या भागात चोरीमुळे यावल शहरात खळबळ
यावल (सुरेश पाटिल ): यावल शहरातील बोरावल गेट परिसरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फार मोठी वर्दळ असलेल्या भागातील एका दुकानातून आज दिनांक 8 सोमवार रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एक जनरल स्टोअर्स दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून 1 झेरॉक्स मशीन व गल्यातील 300 ते 400 रुपये चोरून नेल्याने यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बोरावल गेट भागात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत संपूर्ण यावल शहरातील मजूर वर्गाची व इतर सर्व व्यवसायिकांची, आणि विविध प्रकारचे कामे करणाऱ्यासह काही अवैध धंदे करणाऱ्यांची फार मोठी वर्दळ असते, यामुळे या भागात सर्व स्तरातील व्यावसायिकांचा मोठा जनसंपर्क वाढलेला आहे, कोरोना विषाणू च्या महामारीत आणि आर्थिक अडचणीत आलेल्या परिस्थितीत या भागातील संजय शिंपी या व्यक्तीचे जनरल स्टोअर्स दुकानाचे शटरचे कुलपे तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानात अनधिकृत प्रवेश करून अंदाजे 17 हजार रुपये किमतीचे झेरॉक्स मशीन आणि गल्यातील 300 ते 400 रोख रूपये चोरून नेल्याची घटना आज दिनांक 8 सोमवार रोजी रात्री घडली यामुळे बोरावल गेट परिसरासह संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली, चोरीचे वृत्त कळताच यावल पोलिसांनी पुढील कार्यवाही तात्काळ सुरू केली आहे.