Yaval news

यावल येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत व्यापारी वर्गात तीव्र नाराजी

Featured जळगाव
Share This:

यावल येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत व्यापारी वर्गात तीव्र नाराजी, अनेक माक्स न वापरतात खुलेआम फिरतात.

यावल  ( सुरेश पाटील ) : शहरात सर्वपक्षीयांकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला असला तरी शहरात यावल कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, यावल बस स्टँड परिसरात, मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी तसेच शहरात इतर अनेक ठिकाणी बहुसंख्य नागरिक माक्स न वापरता मोठी गर्दी करून खुलेआम फिरत असल्याने यावल शहरातील व्यापारी वर्गात मोठी तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी यावल नगरपालिका सभागृहात शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, काही समाजसेवकांसह, व्यापारी मंडळ प्रतिनिधि आणि प्रमुख व्यक्तींची बैठक घेण्यात आली होती त्यात दिनांक 25, 26 व दि.27 जून असे 3 दिवस शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे निश्चित करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित व्यापारी मंडळ प्रतिनिधीच्या वैयक्तिक निर्णय आणि विचारांशी यावल शहरातील 50% व्यापारी सहमत नसल्याने तसेच उपस्थित इतर काही ठराविक समाजसेवक आणि काही पदाधिकारी यांच्या एकतर्फी निर्णयामुळे यावल शहरातील अनेक नागरिकांसह किराणा व्यापारी वगळता इतर सर्व व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे,
तसेच उपस्थित काही तथाकथित पदाधिकारी आणि स्वतःला समाजसेवक म्हणून घेणाऱ्याच्या निर्णयाशी संपूर्ण यावलकर सहमत राहतीलच असे नाही कारण की ही लोकशाही आहे उपस्थितांपैकी अनेकांचे काही समर्थक यावल कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व मुख्य रस्त्यावर ठिक-ठिकाणी आणि नगरपालिका व्यापारी संकुलनात मास्क न लावता मोठी गर्दी करीत असतात तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट, चौबल सिट विरुद्ध बाजूने सुसाट वेगाने माक्स न लावता मोटरसायकली पळवीत असतात ही यावल शहरातील वस्तुस्थिति आहे, त्यामुळे कोरोनाविषाणुला प्रतिबंध कसा होईल ? यावरून शहरातील अनेक सर्वपक्षीय काही पदाधिकाऱ्यांच्या आणि काही समाजसेवकांच्या, आणि फक्त दोन-तीन किराणा व्यापाऱ्यांच्या निर्णयाशी संपूर्ण यावलकरांची सहमती नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Yaval news

यावल शहर तीन दिवस बंद असताना सुध्दा हा विक्रेता मेन रोडवर माक्स पूर्णपणे नाकावर न लावता देशमुख डॉक्टर यांच्या दवाखान्या समोर आंबे विकत आहे यावल नगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे असे यावल शहरात बोलले जात आहे

 

 

 

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *