यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Featured जळगाव
Share This:

यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या हस्ते ध्वजारोहण

यावल (सुरेश पाटील): येथे सातोद रोडवरील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तथा तहसील कार्यालयाच्या आवारात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 73 वा वर्धापन दिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना विषाणू बाबत सतर्कता बाळगून, सोशल डिस्टन्स राखून तसेच सेंनीटायझर चा वापर करून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात 15 ऑगस्ट वर्धापन दिन तहसिलदार जितेंद्र कुंवर यांच्या हस्ते ध्वजवंदन करून मोठ्या उत्साहात शांततेत पार पडला. कोरोनाविषाणू बाबत सतर्कता बाळगून तालुक्यातील काही मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक आणि संघटना पदाधिकारी अल्पसंख्येने उपस्थित होते त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद गट नेता प्रभाकर आप्पा सोनवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना उर्फ तुषार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण बापू चौधरी पंचायत समिती गटनेते शेखर पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पोलिस निरीक्षक चव्हाण,पीएसआय खैरनार, खंडबहाळे, पोलीस कर्मचारी आपल्या राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *