अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर यावल तहसीलदार व सर्कल यांची मेहरबानी

Featured जळगाव
Share This:

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर यावल तहसीलदार व सर्कल यांची मेहरबानी.

सव्वा लाख दंड आकारण्या ऐवजी प्रकरण रफादफा?

जिल्हाधिकारी प्रांताधिकारी चौकशी करणार का?

यावल (सुरेश पाटील): अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल येथील मंडळ अधिकारी आणि अंजाळे येथील तलाठी यांनी पकडले,ट्रॅक्टर पकडल्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्कल याने यावल पोस्टेला हे ट्रॅक्टर वाळूसह जमा केले त्यानंतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकाकडून यावल तहसीलदाराने सव्वा लाख रुपये दंड आकारणी न करता वाळू तस्करी प्रकरण रफादफा करून लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडविला,हे प्रकरण आणि एका शासकीय अधिकाऱ्याचा मनमानीयुक्त बेकायदा अधिकार माहिती अधिकारामुळे प्रथमदर्शनी उघडकीस आला आहे, जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी फैजपूर या प्रकरणाची चौकशी करणार आहे किंवा नाही असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल भाग मंडळ अधिकारी आणि तलाठी अंजाळे यांनी दि.6/2/2021रोजी यावल येथील हडकाई नदी पात्रात अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळून आलेल्या ट्रॅक्‍टरचा पंचनामा अवैध वाळू वाहतूक करणारे दुसरे 2 जण भरत कोळी आणि एजाजोद्दीन नियाजोद्दीन देशमुख या दोन पंचांसमक्ष केला होता आणि आहे,हा पंचनामा प्रत्यक्ष बघितला असता पंचनाम्यात अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर किती वाजता पकडले त्याबाबत वेळ नमूद केलेली नाही आणि पंच अवैध वाळू वाहतूक करणारेच इतर दोन जण असल्याने या अवैध वाळू तस्कर प्रकरणाबाबत दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पकडलेले ट्रॅक्टर पंचनामा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी यावल पोलीस स्टेशनला जमा- यावल पोलिसांकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता अनधिकृतपणे वाळू/रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ताब्यात ठेवणे बाबतच्या विषयान्वये मंडळ अधिकारी यावल यांनी पोलिस निरीक्षक यावल यांना दि.9/2/2021 रोजी संध्याकाळी18:41वाजता लेखी पत्र दिले आहे,त्या पत्रानुसार अवैध वाळू रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर यावल पोलिसांच्या ताब्यात दिला होता आणि आहे मंडळ अधिकाऱ्याच्या या पत्रावरील दिनांक बघितली असता दि.6/2/2021 दुरुस्त करून दि.9/2/2021केली आहे,पोलिसांच्या ताब्यात दिलेले ट्रॅक्टर मंडळ अधिकारी यांनी दि.6/2/2021रोजी ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे मग 3 दिवस ते ट्रॅक्टर मंडळ अधिकाऱ्याने किंवा ट्रॅक्टर मालकाने कुठे कुठे आणि कशासाठी कोणत्या व्यवहारासाठी कुठेकुठे फिरविले/पळविले आणि कोणाच्या ताब्यात ठेवले होते हा कायदेशीर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अनधिकृत वाळू/रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यावल पोलिसांच्या ताब्यात देत आहे असे खुद्द यावल मंडळ अधिकाऱ्याने नमूद केले असताना यावल तहसीलदार महेश पवार यांनी दि.16/2/2021चे आदेशात म्हटले आहे की सदरचे वाहन ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत नसून त्यादिवशी सदरचे वाहन शेतीकामासाठी जात असताना महादेव मंदिराजवळ वाहनाशेजारी वाळू पडलेली होती,गैरसमजुतीने ट्रॅक्टर पकडण्यात आले असल्याचे ट्रॅक्टर मालकांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आणि तहसीलदाराने डोळे मिटून आपल्या अधिकाराचा पदाचा दुरुपयोग/मनमानीपणा करून ट्रॅक्टर वाहन मालकास कुठलाही शासकीय दंड आकारण्याची कुठलीही तरतूद नाही तरी संबंधित वाहन मालकाला भविष्यात अवैध गौण खनिज वाहतूक न करण्याची सक्त ताकीद देऊन सोडण्यात येत आहे असे दिलेल्या आदेशात यावल तहसीलदार महेश पवार यांनी म्हटले आहे,ज्या दिवशी आदेश केला त्याच दिवशी पोलीस निरीक्षक यावल यांना यावल तहसीलदार यांनी लेखी पत्र देऊन ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर ताब्यात देण्याचे कळविले आहे,तरी यावल तहसीलदार महेश पवार आणि यावल मंडळ अधिकारी बबन तडवी यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर जी मेहरबानी दाखविली आणि शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला म्हणून या प्रकरणाची जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत तसेच प्रांताधिकारी फैजपूर कैलास कडलक यांनी सखोल चौकशी व कार्यवाही करून अवैध वाळू दंडाची रक्कम संबंधित यावल तहसीलदार महेश पवार आणि यावल मंडळ अधिकारी बबन तडवी यांच्या वेतनातून वसूल करण्याची व इतर योग्य ती आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील,अध्यक्ष-जनसंसद जळगाव जिल्हा.
संघटक-भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास(आदरणीय अण्णा हजारे कृत)जळगाव जिल्हा.यांनी केली आहे याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सुद्धा करण्यात येणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *