
आज दुपारी 2 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावल तालुका शिवसेनेची बैठक.
आज दुपारी 2 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावल तालुका शिवसेनेची बैठक.
यावल ( सुरेश पाटील ): शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुका शिवसेनेची बैठक यावल येथे आज दि.2 रोजी दुपारी 2 वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होणार आहे.
यावल तालुका शिवसेना बैठकीत जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील प्रमुख विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी यावल तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेच्या सर्व पदाधिकारी विभागप्रमुख शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे,फैजपुर शहर प्रमुख अमोल निंबाळे,यावल नगरपरिषद माजी अध्यक्ष तथा नगरसेवक सौ.सुरेखा शरद कोळी यांनी केले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात संतोष वाघ यांनी नमूद केले आहे.