यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली यावल पंचायत समिती तर्फे झालेल्या विकास कामांच्या चौकशीची मागणी

Featured जळगाव
Share This:

यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांना निवेदन देताना यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील एम.बी.तडवी सर निवृत्ती धांडे छायाचित्रात दिसत आहेत.

यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली यावल पंचायत समिती तर्फे झालेल्या विकास कामांच्या चौकशीची मागणी.

यावल ( सुरेश पाटील): यावल तालुक्यात मार्च2020ते मार्च2021च्या कोविड-२च्या संबारबंदी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अंतर्गत झालेल्या विविध विकास कामाची चौकशी करणेची मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी व त्यांच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दि.15जून2021रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यातील विविध ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती, यावल यांच्या माध्यमातून अनेक गावामध्ये रोजगार हमी योजने अतर्गत विविध विकास कामे करण्यात आली असून या कामासदर्भात अनेक ग्रामस्थ व सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्याच्या निकृष्ट कामे करण्याच्या तक्रारी असतानाही प्रशासकीय यंत्रणेकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष करून सबधीत ठेकदाराशी हातमिळविणी करून कामाची बिले अदा केली असून पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या या सर्व कामाची सखोल चौकशी करण्यात यावी,
डोगरदे,डोगरकठोरा शिवारातील नदीपात्रातील पाणी अडवा पाणी जिरवा या योजने अंतर्गत झालेले कामे ही
अत्यत निकृष्ट प्रतिचे साहित्य वापरुन बाधकाम करण्यात आले असून या पावसाळ्यामध्ये हे कामे वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.डोगरकठोरा गावापासून ते यावल-फैजपूर रोड पर्यतचा झालेल्या डाबरीकरण रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे झालेले नाही.डांबराचे प्रमाण कमी असल्याने येत्या पावसाच्यामध्ये हा रस्ता पुन्हा खड्डेमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्टेट बैंक ते सातोद रस्ता हा रस्ता वर्षापासून तयार करण्याचे साहित्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस पडून आहे. वर्षापासून हे काम प्रलंबित असून काम न होता या कामाचे बिल अदा करण्यात आल्याची चर्चा असून संबंधित कामाची सखोल चौकशी करण्यात यावी.
अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी वस्ती-पाड्यावर शासनाकडून मिळालेल्या निधीतून झालेल्या विविध
विकास कामांची देखील चौकशी करण्यात यावी.यावल तालुक्या मध्ये जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत येणान्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या विविध योजनेतील नविन इमारती बांधकाम व दूरुस्ती संरक्षण भिंतीच्या झालेल्या किंवा प्रगतीपथावर असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी व्हावी.यावल तालूक्यातील सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद अंतर्गत व पंचायत समिती यावल यांच्या अंतर्गत मार्च 2020ते मे2021 या कोविड-१९च्या संचारबंदी काळामध्ये झालेली सर्व कामे ही अतिघाई गर्दीने व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कोणत्याही संबंधीत अभियंत्याने कामाचे निरिक्षण न करता अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे सर्व संबंधित ठेकेदारांशी हातमिळवणी करन निकृष्ट दर्जाच्या कामांची बिले अदा करण्यात आलेली दिसून येत आहे.संपूर्ण देश आर्थिक अडचणीत असताना तसेच हवालदील असताना सर्व शासन यंत्रणा अडचणीत असताना या कामाचे घाई गर्दी करून
संपूर्ण कामे संचारबदीचा फायदा घेऊन जनतेच्या टाळूवरील लोणी खाण्याचा संगनमताने फायदे करून घेताना दिसत आहे.या सर्व कामांची उच्च स्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे चौकशी न केल्यास लोकशाही मार्गाने कायदेशीर पद्धतीने न्यायालयाचे न्यायालयात दाद तसेच लोकशाही पद्धतीने आंदोलन करू याची  संबधीत अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांची स्वाक्षरी असून माहितीस्तव निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार,ग्राम विकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ,जिल्हाधिकारी जळगाव,यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *