
यावल तालुक्यातील लोकप्रतिनिधींना लागले कोरोनाचे ग्रहण- जि.प. सदस्यासह 19 कोरोनाबाधित रुग्ण
यावल तालुक्यातील लोकप्रतिनिधींना लागले कोरोनाचे ग्रहण- जि.प. सदस्यासह 19 कोरोनाबाधित रुग्ण.
यावल ( सुरेश पाटील ): यावल तालुक्यात आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान एका जिल्हा परिषद सदस्यसह एकूण 19 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने राजकारणात, ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.
साकळी गांवातील 12 , अट्रावल 4 , फैजपुर 2 , म्हेसवाड़ी 1 असे एकूण 19 जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे, माजी खासदार, आमदार यांचेसह यावल पंचायत समिती 1 सदस्य, जिल्हा परिषदेतील एक सभापती तथा यावल तालुक्यातील एक जिल्हा परिषद सदस्य यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने कोरोना या महामारी विषाणूने लोकप्रतिनिधींसह डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, होमगार्ड यांना व इतर अनेकाना सुद्धा सोडलेले नाही याबाबत अनेक आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तसेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता वैयक्तिक रित्या आपल्या व जनतेच्या आरोग्य हितासाठी जनतेच्या संपर्कात येताना फारच दक्षता बाळगायला पाहिजे असे राजकारणात बोलले जात आहे याबाबत साकळी परिसरातील लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.