यावल शहरात मुख्य रस्त्यावर वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत 6 तास पडुन

Featured जळगाव
Share This:

यावल शहरात मुख्य रस्त्यावर वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत 6 तास पडुन

यावल शहरात 95% माणुसकी खड्ड्यात.

कोरोनाच्या भितीमुळे कुणीही मदतीला सरसावले नाही.

दोन पत्रकारांनी आणि भाजप तालुकाध्यक्षांनी त्या महिलेचा तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यावल (सुरेश पाटील):संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत प्रत्येक व्यक्ति हे कोणत्या न कोणत्या भितीच्या सावटाखाली वावरत असुन,अशाच एका माणुसकी शुन्य घटनेचे दर्शन यावल शहरात काल दि.12सोमवार रोजी मुख्य रस्त्यावर दिसून आले. सुमारे 5 ते 6 तास एका दुकानदाराच्या ओट्यावर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती ही घटना यावल शहरातील 95 टक्के नागरिकांना आणि काही लोकप्रतिनिधींना तसेच व्हाट्सअप वर सतत कार्यरत असणाऱ्यांना माहित असून सुद्धा त्या महिलेला प्रथमोपचारासाठी कोणीही यावल ग्रामीण रुग्णालयात नेले नाही तसेच एक साधा मेसेज सुद्धा अनेक असलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर कोणी टाकला नाही ही माणुसकीची मोठी शोकांतिका काल यावल शहरात अनुभवास आली,शासकीय कर्मचारी, काही लोकप्रतिनिधी अनेक स्वतःला समाजसेवक म्हणून घेणारे सुद्धा या मुख्य रस्त्याने जा ये करीत असतात परंतु त्यांनी सुद्धा आंधळ्याची भूमिका घेतल्याने यावल शहरात मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यावल शहरातील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील गावडे, राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अयुब पटेल आणि भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांना सदर महिला बेशुद्ध असल्याचे समजताच त्यांनी कोरोना बाबतीत दक्षता बाळगुन त्या महिलेस रिक्षाद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयात पुढील औषधोपचारासाठी तत्काळ दाखल केले.
दरम्यान याबाबत प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने माहीती दिली ती अशी की यावल तालुक्यातील कोळवद येथील जावुबाई मंगा भिल्ल वय६५ वर्ष  ही परित्कता असलेली महीला ही संजय गांधी निराधार योजने चे पैसे जळगाव जनता सहकारी बँकेत घेण्यासाठी काल आली असता,बॅंकेच्या बाहेर समोरील एका दुकानाच्या ओटयावर बेशुद्ध अवस्थेत पडुन होती,उन्हाळा चालू असून उन्हात त्या महिलेला अचानक ओट्यावर झोपलेल्या अवस्थेत किंवा बेशुद्ध अवस्थेत शहरातील प्रमुख बाजारात मुख्य रस्त्यावर तसेच अत्यंत वर्दळीचे ठिकाण असताना नागरिकांना आढळून आली असे असताना देखील देखील ही महिला कोण?ती अशा अवस्थेत का पडली आहे अशी साधी विचारपुस चौकशी देखील कुणी केली नाही, तसेच व्हाट्सअप वर कोणी मेसेज सुद्धा टाकला नाही किंवा यावल पोलिसात, यावल ग्रामीण रुग्णालयात,यावल नगरपालिकेत कोणीही माहिती दिलेली नाही अखेर सहा ते सात तासानंतर यावल येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी सुनील गावडे पत्रकार अयुब पटेल भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे हे त्या मार्गाने जात असतांना सदरची महिला दिसुन आली त्या महिलेचा श्वासोश्वास चालू आहे त्यानंतर ही महिला कोळवद ता.यावल येथील असल्याचे कळताच चेतन अढळकर यांनी माणुकीसचे दर्शन घडवित उमेश फेगडे यांनी तात्काळ रिक्षा बोलावून तात्काळ् संपर्कातील मंडळींना फोन करून तात्काळ वृद्ध महीलेस औषध उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालयात कसे पाठवता येईल यासाठी प्रयत्न केले,दरम्यान सदरची महिला कोळवद येथील राहणारी असल्याने अढळकर यांनी भाजपाचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल गोवींदा पाटील यांच्याशी आणी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्याशी संपर्क साधल्याने दोघ ही तात्काळ हजर झाले व त्यांनी ऑटो रिक्शा बोलवुन वृद्ध महीलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,यावेळी वेद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, परिचारिका प्रियंका महाजन यांनी त्वरीत दखल घेत उपचारास सुरूवात केली उशीरा पर्यंत त्या महीलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझीटीव्ह असल्याने त्या महीलेस जळगाव येथे तत्काळ पाठविण्यात आले आहे.सदर महीलेस जर तत्काळ वेळेवर उपचार मिळाले नसते किंवा ती रात्रभर त्याच ओटयावर बेवारस म्हणुन पडुन राहीली असती तर ती जिवंत राहीली नसती असे आरोग्य सुत्रांकडुन सांगण्यात आले.काही असो यावल शहरात 95 टक्के बेफिकीर माणुसकीहीन लोकांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्या महिलेला तात्काळ मदत करणाऱ्यांचे कौतुक सुद्धा करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *