
यावल पोलीस स्टेशनला गळती सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
यावल पोलीस स्टेशनला गळती सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
यावल (सुरेश पाटिल ): यावल येथील पोलीस स्टेशनला गळती लागली परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती न केल्यामुळे पोलीस स्टेशन मधील महत्वाचे दस्तऐवज, रेकॉर्ड खराब होऊ नये म्हणून यावल येथील सर्व पोलिसांनी मिळून पोलीस स्टेशन कार्यालयाच्या वरील कौलारू भागावर प्लॅस्टिकचा कागद टाकून गळती थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.
यावल पोलीस स्टेशन कार्यालयाच्या वरील कौलै बदलवून दुरुस्ती करून मिळणे बाबत यावल पोलीस निरीक्षक व यावल पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या आणि आहेत तरी सुद्धा यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस स्टेशन कार्यालयाच्या वरील कौले बदलून न दिल्याने किंवा दुरुस्ती न केल्याने येत्या पावसाळ्यात पोलीस स्टेशन कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज / रेकॉर्ड , कागदपत्र खराब होऊ नये म्हणून यावल पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या छतावर प्लास्टिकचा कागद टाकून गळती थांबविण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने यावल पोलीस स्टेशन कार्यालयाची संपूर्ण दुरुस्ती, रिपेयर करुन कौले बदलविण्याची तात्काळ कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरासह पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी यावल पोलीस स्टेशन आवारातील तुरुंगातून एक कैदी फरार झाला होता त्यावेळी यावल पोलीस कार्यालय व तुरुगांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने किती खर्च केला आहे किंवा नाही याची चौकशी केली असता त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च दाखविलेला होता परंतु प्रत्यक्षात एक रुपया सुद्धा खर्च केला नसल्याचे उघड झाले होते त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती त्यावेळेस चौकशी काय झाली ते पुढे कोणाला काही समजले नाही आता पुन्हा यावल पोलीस स्टेशनला गळती लागल्याने गेल्या तीन-चार वर्षात यावल पोलीस स्टेशनवर सार्वजनिक बांधकाम विभागाने किती खर्च केला आहे किंवा नाही याची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी असे सुद्धा संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.