
यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंची उचलबांगडी, तात्पुरता पदभार फैजपुरचे वानखेडे यांच्याकडे
यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंची उचलबांगडी, तात्पुरता पदभार फैजपुरचे वानखेडे यांच्याकडे
यावल (सुरेश पाटील): यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची मानव संसाधन विभागात बदली, राजोरा प्रकरण भोवले
यावल : येथील पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांची तडका फडकी मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे. तालुक्यातील राजोरा येथील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेल्याचे प्रकरणी त्यांची तक्रार झाली होती तेव्हा हे प्रकरण त्यांना अंगलट येत बदली झाल्याचे बोलले जात आहे. पोलीस निरीक्षक धनवडे यांच्याकडील तात्पुरता पदभार फैजपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्याकडे दिल्याचे समजले
राजोरा ता. यावल येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस १० ऑक्टोंबर रोजी अज्ञात तरूणाने फुस लावुन पळवुन नेल्या प्र्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र, या गुन्ह्यात संशयीत आरोपीस १३ आक्टोबरला मुलीसह पोलिस ठाण्यात आणले असता पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांनी संशयित सोनवणे याच्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही केली नाही व मुलीची वैद्यकीय तपासणी केली नाही तेव्हा पोलिस निरिक्षक धनवडे यांच्या विरूध्द मुलीच्या पालकांनी पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे तक्रार केली तेव्हा या गुन्ह्याचा तपास फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या कडे देण्यात आला आणी याचं प्रकरणी आमदार शिरिष चौधरी यांच्या कडे पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी भेट घेत तक्रार केली तेव्हा आमदार चौधरी यांनी देखील राज्याचे गृहमंत्र्यांकडे तक्रार केली एकुण हेचं प्रकरण पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांना भोवले असे बोलले जात आहे या प्रकरणाची चौकशी देखील सुरू असुन शुक्रवारी रात्री पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांना बदली संर्दभातील आदेश प्राप्त झाले त्यांची तडकाफडकी येथुन मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली वरिष्ठांच्या आदेशा नुसार बदली झाल्याचे पोलिस निरिक्षक धनवडे यांनी सांगीतले. तर सद्या यावल पोलिस ठाण्याचा पदभार फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या कडे देण्यात आला आहे.