यावल पंचायत समिती समोर काँग्रेसतर्फे चुली पेटवुन आंदोलन

Featured जळगाव
Share This:

यावल पंचायत समिती समोर काँग्रेसतर्फे चुली पेटवुन आंदोलन

यावल (सुरेश पाटील): आज यावल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आमदार नानाजी पटोले साहेब यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड.संदीपभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार प.स.कार्यालय समोर यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यावल रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. शिरीषदादा चौधरी,जि.प.गटनेते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चुली पेटवा आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महागाई विरोधात चुलीवर पोळी, भजे,चहा असा इतर स्वयंपाक करून अनेक महिलांनी निषेध व्यक्त केला यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी,प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी मोदी आणि केंद्रसरकारवरआपल्या शैलीत भाषणातून जोरदार हल्ला चढवला आंदोलन चालू असतांना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या आणि उपस्थित सामान्य जनतेनेही आंदोलनास पाठींबा दर्शवला या आंदोलनात इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील,प.स.गटनेते शेखर पाटील,अ.जा.काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे,शहराध्यक्ष कदिर खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष,युवानेते वढोड्याचे तरुण सरपंच संदीपभैय्या सोनवणे, कोरपावलीचे युवा सरपंच विलास अडकमोल,महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,नगरसेवक गुलाम रसूल,मनोहर सोनवणे, समीर खान,समीर मोमीन,बशीर तडवी,शेतकी संघाचे संचालक अमोलभाऊ भिरुड, शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे,नईमभाई शेख, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,सकलेन शेख,अय्युब खान, मंजूर खान,रहेमान खाटीक, विजय बंडू गजरे,विक्की गजरे, अरुण तायडे,शेख आसिफ, अभिषेक इंगळे,निसार भाई, बबलू गजरे,भूषण कोळी, लीलाधर सोनवणे,भैय्या अडकमोल,भीमराव इंधटे,अजय बढे,महिला भगिनी दुर्गाताई सोनवणे,सिंधुताई तायडे, पद्माताई तायडे,रजनीताई तायडे, अरुणाताई तायडे,शरिफाताई तडवी,सकिनाताई तडवी, शाहानुरताई तडवी,रुस्तुलताई तडवी,सरोजताई तडवी, नशिबाताई तडवी सहित असंख्य महिला पुरुष युवक आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *