हौदातील गणेशमूर्ती विसर्जन आणि मूर्तीदान या उपक्रमांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी

Featured जळगाव
Share This:

हिंदू जनजागृती समितीतर्फे यावल तहसीलदारांना निवेदन

यावल (सुरेशपाटील) गणेशोत्सव कालावधीत प्रतिवर्षाप्रमाणे बुद्धीप्रामाण्यवादी आणि कथित पर्यावरणवादी यांच्या अपप्रचाराला बळी पडून राज्यातील अनेक नगरपालिका,ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आदींनी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद,तसेच ‘गणेश मूर्तीदान ‘/ ‘मूर्ती संकलन’हे उपक्रम राबवल्याचे लक्षात आले.यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी भाविकांना पारंपारिक विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आणि वरील उपक्रम अनेक ठिकाणी नागरिकांवर लादण्यात आले.

तसेच ‘ फिरत्या कृत्रिम हौदा’ची व्यवस्था करून त्यामध्ये भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करावे,असेही आवाहन केले गेले.प्रत्यक्षात पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबबण्यात आलेल्या या उपक्रमातील ‘फिरते रथ ‘ चक्क कचरापेट्यांपासून बनवल्याचे उघड झाले . त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरिकांची घोर फसवणूक करत मोठ्या प्रमाणात भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे उघड झाले होते. तरी अशाप्रकारे देवतांची विटंबना होऊ नये,यासाठी हिंदु जनजागृती समिती दक्ष असते.यास्तव आपल्या क्षेत्रात विसर्जन न करता दान म्हणून संकलन केलेल्या,तसेच कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या मूर्तीबाबतचा अहवाल प्रशासनाने नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली.

यावल तहसीलदार यांच्याकडे आज दिनांक 16 बुधवार रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पारंपारिक विसर्जनाला नागरिकांनी फाटा दिला,नागरिकांनी विश्वासाने केलेल्या या कृतीला प्रशासनानेही पुढील माहिती देऊन प्रतिसाद द्यावा,ही अपेक्षा आहे.प्रशासनाने पुढील माहिती जनतेसाठी खुली करावी,अशी आम्ही मागणी करत आहोत.

१)यंदाच्या वर्षी आपल्या क्षेत्रात प्रशासनाने किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून किती ठिकाणी ‘ कृत्रिम हौद ‘किंवा ‘फिरते कृत्रित हौद ‘उपलब्ध केले होते?

२)या कृत्रिम हौदांमध्ये किती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले?

३) या हौदातून विसर्जित केलेल्या मूर्ती बाहेर काढून त्यांचे पुढे काय करण्यात आले?

४) यंदाच्या वर्षी आपल्या क्षेत्रात प्रशासनाने किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून किती ठिकाणी ‘मूर्तीदान केंद्र ‘किंवा ‘ मूर्ती संकलन केंद्र’उभारले होते?

५)याठिकाणी किती मूर्तीचे दान मिळाले किंवा किती मूर्ती संकलित झाल्या ?

६)या दान मिळालेल्या मूर्तीचे प्रशासनाने पुढे काय केले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर हिंदू जनजागृती समितीचे धिरज भोळे, प्रशांत जुवेकर ,स्वप्निल कोलते, प्रसाद कोलते, प्रवीण बडगुजर,निलेश महाजन, राहुल दिपके, मोहन जमकारे, राहुल कोळी, गणेश कोलते, अजय नेवे, चेतन भोईटे यांची स्वाक्षरी आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *