यावल नगरपरिषदेची सभा लाच प्रकरणावरून गाजली की गाजवली?- यावलकरांची दिशाभूल तालुक्यात चर्चेचा विषय

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषदेची सभा लाच प्रकरणावरून गाजली की गाजवली?

यावलकरांची दिशाभूल तालुक्यात चर्चेचा विषय.

यावल (सुरेश पाटील) : येथील नगरपरिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेत लाचखोर मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला आणि दोन विषय तहकूब करण्यात आले नगरपालिका अध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये मतभेद असल्या बाबत आणि यावल नगरपालिकेची सभा मुख्याधिकारी यांच्या लाच प्रकरणावरून गाजली की गाजविण्यात आली याबाबत मात्र काही सदस्यांकडून यावलकरांची दिशाभूल करण्यात येत आहे का?असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
दि.3ऑगस्ट2021मंगळवार रोजी यावल नगरपरिषदेची ऑनलाइन सभा नगराध्यक्ष नौशाद तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यात एकुण40विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते, विषय पत्रिके मधील कामकाजास सुरू होण्याअगोदर नगरपरिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी दि30जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 28हजार रुपयांची लाच घेताना मुख्याधिकारी बबन तडवी यांना रंगेहाथ पकडल्याने यावल शहराची व नगरपरिषदेची बदनामी झाली आहे असे सांगत सव्वाशे वर्षाच्या नगरपरिषदेच्या इतिहासात असे प्रथम घडल्याने यावल शहर बदनाम झाले म्हणून मुख्याधिकारी बबन तडवी यांचा निषेध करण्याचा ठराव मांडला त्या सभेतील कार्यालयीन अधीक्षक विजय बडे यांनी न्यायालयीन बाब असल्याने ठराव संमत करता येणार नाही असे सांगितले त्यावरून नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील प्राध्यापक मुकेश येवले सदस्य दीपक बेहेडे यांनी आक्रमक भूमिका घेऊन निषेधाचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला, गटनेते अतुल पाटील यांनी यापूर्वी सभागृहात शहरांमध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आलेले असून चुकीच्या कामांचा देखील विरोध करून निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले यां निषेधाचा ठरावाने न्यायालयीन कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नसून शहर बदनाम करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतल्याने शेवटी सर्वानुमते निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
लाच घेणे आणि देणे हा कायदेशीर गुन्हा असला तरी तसेच लाच घेणाऱ्याचा निषेध नोंदविणे ही कौतुकास्पद आणि वस्तुस्थिती सुद्धा आहे,परंतु यावल नगरपरिषदेत गेल्या पंधरा वीस वर्षापासून टक्केवारीमुळे त्या कालावधीतील मुख्याधिकारी आणि अनेक नगरसेवक आणि काही अध्यक्ष कशामुळे गप्प बसून होते आणि आहेत?आतापर्यंत विकास कामांमध्ये टक्केवारी दिलेली नाही का? आणि टक्केवारी कोणीही घेतलेली नाही का?आणि ठेकेदाराने टक्केवारी दिलेली नसेल तर बांधकामे निकृष्ट प्रतीची का झाली आहेत?निकृष्ट बांधकामाबाबत आज तागायत कोणी आवाज का उठविलेला नाही? तसेच ठेकेदाराच्या नावावरती प्रत्यक्षात कोणी कोण कोणती विकास कामे केली आहेत? हे यावल करांना चांगल्याप्रकारे ज्ञात आहे,यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात स्टेशनरी घोटाळा निकृष्ट प्रतीची कामे यासह अनेक अनधिकृत अतिक्रमित बांधकामाबाबत अनेकांच्या लेखी तक्रारी असताना आणि चुकीची कामे झालेली असताना यावल नगरपरिषदेत तसा ठराव करून निषेध नोंदवून कार्यवाही का करण्यात आलेली नाही?परंतु काल दि.3 रोजी झालेल्या सभेत निषेध नोंदविण्यात आल्याने शहरासह तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात अनेक विकास कामातील टक्केवारी आणि निकृष्ट कामे लक्षात घेता आर्थिक व्यवहार आणि ठेकेदाराच्या पडद्यामागील खऱ्या ठेकेदारांची भूमिका नागरिकांच्या लक्षात येऊ नये म्हणून सभा गाजली का? गाजविली?याबाबत अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात आहेत.
सभेमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत विविध विकास कामे करणे असा ठराव चर्चेत आला असता अतुल पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवत गेल्यावर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या कामांची सभागृहात माहिती विचारली केव्हा निविदा काढली?ती ऑनलाईन काढली होती का? कुठले कुठले कामे अंतर्भूत होते? असे विविध प्रश्न विचारून कुठल्याही प्रकारचा मोघम ठराव न करता प्रत्यक्ष कामाचे नाव नमूद करून विषय पत्रिकेत घेण्यात यावे व पुढच्या सभेत विषय मंजूर करण्याबाबत चर्चा करावी म्हणून तो विषय तहकूब करण्यात आला तसेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या गेल्या वर्षांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्य प्राध्यापक मुकेश येवले दीपक बेहडे,राकेश कोलते यांनी लावून धरली व वनविभागाकडून वृक्ष लागवडीसाठी रोपे घेण्याबाबतच्या वित्तीय मंजुरी देखील तहकूब करण्याची मागणी केली. गटनेता अतुल पाटील संतप्त:-.
आजच्या सभेतील एकाही विषयावर मुख्याधिकारी यांनी कायदेशीर टिपणी दिलेली नसल्याने अतुल पाटील चांगलेच संतप्त झाले नगरसेवक कायम शहराच्या विकासासाठी लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र ते विषय कायद्याच्या चौकटीत असावेत म्हणून मुख्याधिकारीची नेमणूक शासनाने प्रत्येक नगरपालिकेत केलेली असते मात्र मुख्याधिकार्‍यांनी चाळीस विषयांपैकी एकाही विषयावरती कायदेशीर मत प्रकट करून टिपणी दिलेली नसल्याने सभागृहात केवळ विषय मंजूर करून घेऊन नंतर इतिवृत्तात सोयीच्या ठराव लिहिण्याचा प्रशासनाचा हलगर्जीपणा सदस्यांना अडचणीत आणू शकतो म्हणून यापुढे प्रत्येक विषयावर मुख्य अधिकाऱ्यांची कायदेशीर टिपणी असल्याशिवाय सभेचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने सर्व सदस्यांनी तो विषय लावून धरला अखेर पुढील सर्व सभेमध्ये विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना कायदेशीर टिपणी दिली जाईल असे कार्यालयीन अधिक्षक बडे यांनी सांगितल्याने कामकाज सुरू झाले एकंदरीत आजच्या बैठकीत नगरसेवक अतुल पाटील यांच्या गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे सभा वादळी होऊन गाजली व नगराध्यक्ष यांच्या विरोधात हा गट गेला की काय?अशी चर्चा दिवसभर यावल शहरात सुरू होती.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *