यावल नगर परिषदेकडून विस्तारित वसाहतींसाठी 5.75 कोटी ची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास

Featured जळगाव
Share This:

यावल नगर परिषदेकडून विस्तारित वसाहतींसाठी5.75 कोटी ची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास

यावल दि.2(सुरेश पाटील): येथील नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भागासाठी 5 कोटी 75 लाख रुपये खर्चाच्या वैशिष्टपूर्ण व 14 वा वित्त आयोग योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या जलकुंभ,रायझिंग(मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याच्या टाकी पर्यंत पाईपलाईन) व वितरण व्यवस्थेसाठी जलवाहिनी टाकणेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आता पुर्णत्वास आली आहे.
याबाबत यावल नगरपालिका माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिलेली माहिती अशी की यावल नगरपरिषदेची हद्दवाढ सन 2010 मध्ये करण्यात आली होती त्यामुळे या भागातील काही वसाहती वगळता इतर भागांमध्ये खाजगी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात होता या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा बाबतच्या अडचणी लक्षात घेता विस्तारित भागातील सर्व वसाहतींना नगरपरिषदद्वारा शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी शासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजनेचे तीन टप्पे करण्यात आले.त्यापैकी 10 लक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ 74 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आला होता व रायझिंग मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याची टाकी पर्यंत चे काम एक कोटी 16 लक्ष रुपये करण्यात आले होते त्यानंतरचा तिसरा टप्पा वितरण व्यवस्थेसाठी एचडीपीई पाईप टाकणे सुमारे 3 कोटी 65 लक्ष रूपये असा एकूण पाच कोटी 75 लाख रुपयांचे काम हाती घेण्यात आले होते या योजनेचे काम वैशिष्ट्यपूर्ण योजना तसेच14वा वित्त आयोग योजनेतून पूर्ण करण्यात आलेले असून यामुळे विस्तारित भागातील सुमारे 27 वसाहतींना पूर्ण दाबाने शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे या योजनेमुळे नगरपरिषदेला पाणीपट्टी द्वारे सुमारे 15 लक्ष रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त होणार आहे.
ज्या नागरिकांकडे नगरपरिषदेचे नळ कनेक्शन नाही अशांनी अर्ज मागणी करून व रितसर फी भरणा करून तात्काळ नवीन नळ जोडणी करून घ्यावी असे आवाहन सुद्धा अतुल पाटील यांनी केले आहे.

माझ्या प्रभागाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आल्याने वचनपूर्ती चा आनंद…अतुल पाटील.

यावल नगरपरिषदेची सन 2010मध्ये हद्दवाढ झाल्या नंतर विस्तारित भागातून मी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे. विस्तारित भागासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व्हावी व नागरिकांना नगरपरिषदेचे मार्फत हक्काचा पाणी पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्नशील होतो ही योजना जवळपास पूर्णत्वास आलेली असून स्वप्नपूर्तीचा,वचनपूर्तीचा आनंद आहे दरम्यान विस्तारित भागातील जुन्या जलवाहिनी वरून पाणीपुरवठा होणाऱ्या सुमारे जुने 650 ते 700 नळ जोड़णी धारकांना नवीन टाकण्यात आलेल्या एचडीपीई पाईप लाईन वरून कुठलाही आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांचेकडून15व्या वित्त आयोग योजनेतून जुने नळ कनेक्शन स्थलांतरित करण्याचे योजनेस मंजुरी मिळाली.जुन्या नळ धारकांना मोफत नळ जोडणी देण्यात येणार आहे महिनाभराच्या कालखंडात नवीन जलकुंभाद्वारे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सक्रीय प्रयत्न सुरु आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *