यावल: माजी खासदार तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी कोरोना ग्रस्त वृत्त व्हायरल झाल्याने आरोग्य विभाग अडचणीत येणार

Featured जळगाव
Share This:

माजी खासदार तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी कोरोना ग्रस्त वृत्त व्हायरल झाल्याने आरोग्य विभाग अडचणीत येणार

यावल (सुरेश पाटिल ):  काल दिनांक 3 बुधवार रोजी रात्री उशिराने जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरावरील माहिती देणारे अधिकारी यांनी माजी खासदार तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी कोरोना ग्रस्त असल्याचे वृत्त व्हायरल केल्याने भारतीय जनता पक्ष व पदाधिकाऱ्यांची बदनामी झाल्याने तसेच रुग्णाची वैयक्तिक आरोग्य संबंधात माहिती प्रसिद्ध केल्याने आरोग्य विभाग अडचणीत येणार असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.

माजी खासदार, माजी आमदार असलेले तालुक्यातील भाजपाचे जिल्ह्याचे पदाधिकारी हे आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध करून रुग्णाचे राजकीय पक्षाचे व पदाचा उल्लेख ( प्रसिद्धी )अनधिकृत रित्या प्रसिद्ध करून बदनामी केल्याने आणि गोपनीयतेचा भंग केल्याने तसेच राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णाचे नांव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश काढलेले असताना तसेच भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या पदाधिकाऱ्यांचा स्वॅप घेतल्याचे सुद्धा प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतीय जनता पार्टी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रावेर विधानसभा व लोकसभा मतदारसंघात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून एका जबाबदार लोकप्रतिनिधी चे पदाचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण शासकीय व आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाकडून रुग्णास बदनामी करणे संदर्भातली माहिती अनधिकृतपणे व्हायरल झाल्याने आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच याबाबत राज्यातील विरोधी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे का ? याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *