
यावल : 32 ग्राम पंचायतीवर महिलांची सत्ता
यावल (सुरेश पाटील). तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 63 गावांच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणासाठी यावल तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आले त्यात अयाज खान अयुब खान वय 13 वर्षे या मुलाच्या हस्ते काढण्यात आल्या. आरक्षणामुळे यात एकूण 32 ग्रामपंचायतींवर महिलांची सत्ता राहील
यात अनुसूचित जाती साठी 8 जागा आरक्षित करण्यात आल्यात त्यात मनवेल,शिरसाळ, दहिगाव, कासवे,कोसगाव,कोरपावली,विरोदा, वर्डी खुर्द तसेच अनुसूचित जमातीसाठी 25गांव आरक्षित करण्यात आली त्यात भालोद, चुंचाळे,कासारखेडा,शिरागड, आडगाव, नायगाव, डांभुर्णी, गिरडगाव, चिंचोली, दुसखेडे, अंजाळे, वडोदा प्र. सावदा, डोंगर कठोरा, विरावली, आमोदे, किनगाव खुर्द, सांगवी बुद्रुक, निमगाव, अट्रावल, हिंगोणा, चिखली खुर्द, उंटावद, महेलखेडी, तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राजोरा, बोरखेडा बुद्रुक, पाडळसे, चिखली बुद्रुक, नावरे, मोहराळे, बोरावल खुर्द, किनगाव बुद्रुक, वनोली, थोरगव्हाण खुर्द, सावखेडा सिम, साकळी, बामणोद, डोणगाव, सांगवी खुर्द आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी टाकरखेडा, न्हावी प्र. अडावद,पिंपरुड, पिळोदे बुद्रुक, बोराळे, बोरावल बुद्रुक, मारुळ, म्हैसवाडी वढोदे प्र.यावल, हंबर्डी, चितोडे, पिंप्री या गावांचे असे आरक्षण काढण्यात आले.
– महिला आरक्षण
32 गावांसाठी 50 टक्के महिलांसाठी आरक्षण सोडत फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या सभेत महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले त्यात संघर्ष राहुल वाघोदे वय 5 वर्षे या बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून महिलांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
त्यात अनुसूचित जाती महिला स्त्री राखीव साठी- मनवेल,शिरसाड,कासवे,वड्री खुर्द तर अनुसूचित जमाती आरक्षणासाठी 13 महिला स्त्री राखीव करण्यात आल्यात त्यात कासारखेडा, डांभुर्णी चिंचोली, आमोदे, सातोद, शिरागड, नायगाव, विरावली, किनगाव खुर्द, निमगाव, हिंगोणे, चिखली खुर्द, महेलखेडी ,
नागरीकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणासाठी राजोरा,सांगवी खुर्द, मोहराळे,थोरगव्हाण,पाडळसे,पिळोदे खुर्द,किनगाव बुद्रुक,सावखेडा सिम,
सर्वसाधारण प्रवर्गासाठी – टाकरखेडा, बोराडे, बोरावल बुद्रुक, पिंपरूड ,भालशिव, हंबर्डी ,पिळोदे बु॥या गावांसाठी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले यावेळी तालुका भरातून सर्वपक्षीय कार्यकर्ते व नवीन सरपंच होऊ पाहणारे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.