
यावल : दगडी येथील शेत मजुरांची गळफास घेऊन आत्महत्या
दगडी येथील शेत मजुरांची गळफास घेऊन आत्महत्या.
यावल तालुक्यातील घटना.
यावल (सुरेश पाटील) :तालुक्यातील दगडी गांवातील 40 वर्षीय शेतमजुरांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.२३ रोजी सकाळी ६ वाजेचा दरम्यान घडली. दगडी येथील चद्रभान शिवदास कोळी वय ४० या शेतमजुरांने नरहर जानकीराम पाटील यांचा शेतातील बांधावर असलेल्या निंबाचा झाडाला गळ्यातील बागायत रुमालाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.
सकाळी शौचालयास गेला असता उशिरा पर्यत घरी न आल्याने इतर ठिकाणी शोध घेतला असता निंबाचा झाडाला लटकलेला मृत्यूदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली.
चद्रभान कोळी याने खाजगी फायनास कंपन्या कडुन कर्ज घेतले होते.व किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह सुरु होता.कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले असल्यामुळे घेतलेले कर्ज व धंद्यावर आलेली मंदी याला कंटाळुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मयताच्या पत्शात पत्नी, दोन मुल, दोन भाऊ, काका असा परीवार आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन दगडी गांवात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.पो.पा.विठ्ठल कोळी यांनी खबर दिल्यावरुन यावल पोलिस स्टेशनला अ.मृ. नोद करण्यात आली आहे.पुढील तपास यावल पोलिस करीत आहे.