यावल: प्रतिबंधित क्षेत्रात सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संताप

Featured जळगाव
Share This:

प्रतिबंधित क्षेत्रात सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संताप

प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचा सर्रास वापराचे हे घ्या पुरावे.

जिल्हाधिकारी, प्रांत यांचे यावल मुख्याधिकाऱ्यावर नियंत्रण नाही.

 यावल (तेज समाचार प्रतिनिधि):  यावल शहरात सर्वात प्रथम दिनांक 20 में रोजी तिरुपती नगर मधील एका व्यक्ती कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे शासकीय स्तरावरून प्रसिद्ध झाल्याने यावल नगरपरिषदेने तिरुपती नगर तात्काळ सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले, त्यानंतर पूर्णवाद नगर, सुदर्शन चित्रमंदिर परिसर, बाबूजीपुरा, देशपांडे गल्ली, आणि त्यानंतर जिनिंग प्रेस व्यापारी संकुलनातील डॉक्टर धिरज चौधरी यांचे हॉस्पिटलचा परिसर सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले, यावेळी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कर्तव्यदक्षतेचा फार मोठा देखावा सादर करून वरील सर्व ठिकाणचे भाग सील केले, सिल करताना मुख्याधिकारी तडवी यांनी भेदभाव करून काही निवासी घरांचा भाग सोडून आरोग्य विभागाच्या निकषांना, अटी-शर्ती न जुमानता यावल शहरातील चार ते पाच ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील ठोकले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना यावल नगरपरिषदेने आज दिनांक 29 शुक्रवार पर्यंत कोणतीही प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी कोणतीही कार्यवाही किंवा पर्यायी व्यवस्था केलेली नाही त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दूध, भाजीपाला, औषधी इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे, ओला व सुका कचरा वाहतूक करणारे वाहन अनियमित केव्हा कुठे आणि कसे येऊन जाते हे कोणाला समजत नाही प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे सिल ठोकलेले असल्यामुळे त्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहना पर्यंत नागरिकांना कचरा घेऊन जाता येत नाही ही वस्तुस्थिती असताना यावल नगरपालिकेने किंवा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहना सोबत इतर कोणताही साफ सफाई कर्मचारी ठेवलेला नाही, इत्यादी सुविधा देणे कामी यावल नगरपरिषदेने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांमध्ये मोठा तिव्र संताप व्यक्त करण्यात येत असून नागरीकांना आपल्या प्राथमिक आणि आवश्यक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आणि गरजा भागविण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून नाईलाजाने ये-जा करावी लागत असल्याचे यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रतिबंधित क्षेत्रात स्पष्ट पुरावे छायाचित्रात दिसून येत आहेत.
याकरिता यावल नगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोणाचीही पर्यायी व्यवस्था न केल्याने तसेच यावल शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील गंभीर परिस्थितीचा विचार लक्षात घेता जिल्हाधिकारी जळगाव, फैजपुर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांचे यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांचेवर नियंत्रण राहिलेले आहे किंवा नाही असे सुद्धा संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *