यावल: 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार- आरोपीस अटक

Featured जळगाव
Share This:

यावल: 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार- आरोपीस अटक

तालुक्यातील किनगांव येथील घटना.

यावल ( सुरेश पाटील ) : शाळेत जाणाऱ्या 9 वर्षीय मुलीला घरातून उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आज दिनांक 25 गुरुवार रोजी दुपारी 16:40 वाजेच्या सुमारास बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून यावल पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली.
याबाबत यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की किनगांव बुद्रुक येथील मन्यारखेडा चुंचाळे रोडवर राहत असलेल्या आदिवासी पावरा जातीच्या एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी गुलाब उर्फ फिरोज उर्फ फिऱ्या सलीम मन्यार राहणार मन्यारवाडा किनगांव बुद्रुक याने फिर्यादीचे आत्याचे घरात जावून फिर्यादीचे अंगाला स्पर्श करून तिने आरडाओरड करू नये म्हणून तिचे तोंडावर हात ठेवून तिचे घरातून उचलून घरापासून काही अंतरावर घराचे बाहेर घेऊन जाऊन फिर्यादीचे अंगावरील कपडे काढून लज्जास्पद कृत्य करून अंगलट केली असता फिर्यादीने आरडाओरड केल्याने फिर्यादीची आत्या तेथे आल्याने आरोपी पळून गेला या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला भादवि कलम 354 ( A ) 452,363,506 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तसेच बालकाचे लैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 7 व 8 प्रमाणे प्रथमदर्शनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनिता कोळकर यांनी चौकशी व कार्यवाही करून यावल पोलीस स्टेशनला भाग-5 गुन्हा र. नं. 115 / 2020 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे करीत आहेत.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *