
यावल: पोलिसांच्या साक्षीने सावकाराने केले तक्रारदारास ट्रॅक्टर परत
पोलिसांच्या साक्षीने सावकाराने केले तक्रारदारास ट्रॅक्टर परत
अवैध सावकारांमधे खळबळ. तालुक्यात ऑनलाइन तेज समाचारचे कौतुक.
यावल पोलीस स्टेशनला अनेकांच्या तक्रारी येणार ?
अंदाजे 50 लाख रुपये किमतीची आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन अनधिकृतपणे सावकाराच्या कब्जात.
संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेचा विषय
यावल ( सुरेश पाटील ): यावल तालुक्यात गुंडगिरी सह अवैध सावकारी शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असे वृत्त ऑनलाईन तेज समाचार मध्ये दिनांक 15 जुलै 2020 बुधवार रोजी प्रसिद्ध होता बरोबर एका सावकाराने आपल्या ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर पोलिसांच्या साक्षीने तक्रारदार शेतकऱ्यांला दिनांक 17 रोजी परत केले. यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने अवैधरित्या सावकारी करणाऱ्या मध्ये मोठी खळबळ उडाली असून सावकारी पाशात अडकलेल्या नागरिकांसह तालुक्यातील नागरिकांमध्ये ऑनलाईन तेज समाचार चे कौतुक करण्यात येत आहे. तसेच तालुक्यात अवैध सावकारांन बाबत यावल पोलीस स्टेशनला अनेकांच्या तक्रारी येणार असल्याच्या सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत.
दिनांक 15 जुलै 2020 बुधवार रोजी ऑनलाईन तेज समाचार मध्ये यावल तालुक्यातील गुंडगिरी सह अवैध सावकारी शेतकऱ्यावर मोठा अन्याय असे वृत्त व्हायलर होता बरोबर तालुक्यातील एका अवैध सावकाराच्या ताब्यात असलेले ट्रॅक्टर त्या सावकाराने पोलिसांच्या साक्षीने संबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्याची घटना दिनांक 17 जुलै 2020 शुक्रवार रोजी घडल्याने तालुक्यात ज्या अवैध सावकारांच्या पाशात अनेक शेतकरी आणि नागरिक आर्थिक व्यवहारात आणि मनमानी पद्धतीने चक्र– वाढ व्याज पद्धतीपेक्षाही जास्त व्याज आकारणी चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून ज्या नागरिकांची दुचाकी चारचाकी वाहने शेती घर प्लॉट इत्यादी प्रॉपर्टी किंवा वस्तू सावकाराच्या कब्जात आहे त्यांच्यापैकी अनेक तक्रारी यावल पोस्टेला करण्यात येणार असल्याचे बोलले जात असून तालुक्यातील एका आदिवासी शेतकऱ्याची अंदाजे पन्नास लाख रुपये किंमतीच्या शेत जमीनवर एका सावकाराने गेल्यात अनेक वर्षापासून आपला कमर्शिअल कब्जा करून हेच ताब्यात घेतले आहे याबाबत सुद्धा यावल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होणार असल्याने संपूर्ण यावल तालुक्यातील लक्ष वेधून आहे.