
मुंबई : मी आतापसून पूर्ण पणे भाजपा-आरएसएस सोबत; माजी नौदल अधिकारी मदन शर्मांची घोषणा
मुंबई (तेज समाचार डेस्क). मुंबईतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आज या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर, माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. मी आतापासून ‘भाजपा-आरएसएस’ सोबत आहे, असं त्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें बाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन, मदन शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
शिवसैनिकांनी मारतांना म्हटले होतेकि मी भाजपाचा आहे
“आतापासून मी भाजपा-आरएसएस सोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली, तेव्हा त्यांनी मी भाजपा-आरएसएस सोबत असल्याचे माझ्यावर आरोप केले होते. तर आता मीच हे जाहीर करतो की, आतापासून मी भाजपा-आरएसएस सोबत आहे.” अशी शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतल्यानंतर माध्यमांसमोर ही घोषणा केली.
राष्ट्रपति राजवटची केली मांगणी
दरम्यान तसेच, राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.