उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा यांच्या उपस्थितीत यावल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

Featured जळगाव
Share This:

उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा यांच्या उपस्थितीत यावल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

यावल (सुरेश पाटील): आज दि.5जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात यावल वन विभाग जळगाव उपवनसंरक्षक पद्मनाभा एच.एस. यावल नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, वन्यजीवच्या सहाय्यक वनसंरक्षक सौ.अश्विनी खोपडे सहा.सहा.वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल विशाल कुटे, व.प.अ.यावल पुर्व विक्रम पदमोर, व.प.अ.गस्ती पथक यावल आनंदा पाटील,सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी यावल,अध्यक्ष सं.व.स.वड्री खु। ललित भाऊ चौधरी,समन्वयक वनांचल सेवाभावी संस्था दिनेश पावरा,वनक्षेत्र यावल पुर्व,यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल,वनरक्षक,वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविका व सुत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व भाग विक्रम पदमोर यांनी केले. तसेच कार्यक्रमात उपवनसंरक्षक पद्मनाभा, नगराध्यक्षा नौशाद तडवी, सहाय्यक वनसंरक्षक विशाल कुटे, सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *