
धुळे : वीज तारखेचा शॉक लागून खांबावरून जमिनीवर पडून कर्मचारी जखमी. प्रकृती चिंताजनक.!
धुळे : वीज तारखेचा शॉक लागून खांबावरून जमिनीवर पडून कर्मचारी जखमी. प्रकृती चिंताजनक.!
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे येथील वीज वितरण कंपनीचा कर्मचारी हा खांबावरुन पडून गंभीर जखमी. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी पांझरा नदीकिनारी जुनी लाइन दुरुस्तीचे काम सुरू होते. काही ठिकाणी जुन्या वायर बदलून नवीन वायर टाकण हे काम ही वीज वितरण कंपनीकडून कर्मचारी करत होते याच दरम्यान संजय कोकणी कर्मचारी साक्री रोड वीज वितरण कंपनीत काम करत असलेल्या खांबावर चढून वायर बदलत असताना वीज वाहक तारचा जोरदार पणे त्याला धक्का बसला व तो खांबांवरून जोरदार पणे जमीनीवर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारार्थ वाहनातून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.त्याच्यावरती तातडीने उपचार डॉक्टर करत आहे यानंतर परिसरातील विद्युत पुरवठा एक ते दीड तास खंडित होता याबाबत शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.