बिनशेतीचा अर्ज येण्याआधी नगरपरिषदेने दिले कामाचे अंदाजपत्रक

Featured जळगाव
Share This:

बिनशेतीचा अर्ज येण्याआधी नगरपरिषदेने दिले कामाचे अंदाजपत्रक

आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा प्रकार झाला उघड

कर्तव्यदक्ष मुख्याधिकार्‍यांनी चौकशी करून कारवाई करावी.

यावल नगर परिषद बिनशेती प्रकरण

यावल ( सुरेश पाटील): यावल नगरपालिकेत दि. 25/12/2011 रोजी गट नंबर 676 बिनशेती करणेबाबतच्या विषयान्वये विनंती अर्ज प्राप्त झाला होता आणि आहे. परंतु हा बिनशेती अर्ज येण्याच्या 4 महिने आधीच तत्कालीन बांधकाम कनिष्ठ अभियंता व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिनांक 31/8/ 2011रोजी कामाचे अंदाजाचे लेखी पत्र दिले असल्याचा लेखी पुरावा माहिती अधिकारात माहिती मागितल्याने आढळून आला यामुळे यावल नगरपरिषदेत शासकीय अधिकाऱ्यांचा दबाव आणि अधिकाराचा गैरवापर आणि पंटरांची दादागिरी उघडकीस आली आहे. तसेच नगरपालिकेत तत्कालीन वेळेस आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातय अशी परिस्थिती होती. त्यामुळे या इतर अनेक बिनशेती प्रकरणांची चौकशी व कारवाई कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी बबन तडवी यांनी नगरपालिकेत रीतसर कायदेशीर ठराव करून करावी तसेच ठरावाला विरोध झाल्यास त्याबाबत सविस्तर टिप्पणी नोंद करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावे अशी मागणी तक्रारदारासह यावल शहरातून होत आहे.
याबाबत माहिती अधिकार कायद्याने मिळालेली माहिती अशी की यावल शिवारातील गट नंबर 676 हे शेत बिनशेती करणे बाबतचा विनंती अर्ज तत्कालीन शेतमालक विमलबाई सोपान भोळे व योगिता अनिल पाटील यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि. 25/12/2011रोजी(दि.9/2/2012आवक नंबर4073) प्राप्त आहे. परंतु दि.25/12/2011रोजी बिनशेती करून मिळणेबाबतच्या अर्जा अगोदर तब्बल 4 महिने आधी यावल नगर परिषद हद्दीतील गट नंबर 676 चे वरील महिला असलेल्या मालकांच्या नावानेच तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने करावयाचे कामाचा तपशील व एकूण रक्कम 16 लाख 94 हजार रुपये विकास शुल्कापोटी पत्र मिळाले पासून 15 दिवसाचे आत नगर परिषदेकडे जमा करावी किंवा राष्ट्रीयकृत बँकेची बँक गॅरंटी किंवा सदर रक्कम इतके प्लॉट गहाण करून देणे किंवा वरील नमूद अंदाजपत्रक व स्पेसिफिकेशन प्रमाणे भौतिक सुविधा दोन महिन्याचे आत नगरपालिका कनिष्ठ अभियंता यांचे देखरेखी खाली पुरविणे आवश्यक राहील असे स्पष्ट कामाचे अंदाजपत्रक तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिले होते आणि आहे. या प्रकरणात शासकीय नियमाची, आदेशाची, सूचनांची पायमल्ली झालेली असल्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी बबन तडवी हे काय कारवाई करतात? याकडे तक्रारदारासह संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *