यावल : उत्साहात साजरा झाला विश्व आदिवासी गौरव दिवस

Featured जळगाव
Share This:

यावल ( सुरेश पाटील ). येथे आज दि.9 ऑगस्ट 2020 रविवार रोजी येथील तडवी वाड्यात तसेच यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात सोशल डिस्टनसचे पालन करून विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त तडवी कॉलनी यावल येथे आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजन करताना यावल नगरपालिका नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक यावेळी तडवी कॉलनी यावल येथील तडवी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सोशल डिस्टन्स बाळगून उपस्थित होते. दरवर्षी हा उत्सव पारंपरिक वाद्य वृंद वेशभूषा तथा नृत्य इत्यादीने समावेश असलेल्या मिरवणुकीने काढला जातो परंतु देशात असलेल्या कोरोना विषाणु महामारी मुळे यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स ठेवून मास्क लावून शांततेत साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक पदाधिकारी मुबारक फत्तु तडवी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिनाच्या औचित्य साधून आदिवासी एकता परिषद यांचेमार्फत तनवीर रशिद तडवी व व अंजुम रशिद तडवी व अरशिया मुबारक तडवी या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

त्याच प्रमाणे यावल येथील जिनींग प्रेस आवारात यावल तालुका आदीवासी कोळी समाजा मार्फत जागतिक आदीवासी दिन व हुतात्मा दिन मोठ्या मोठ्या उत्साहात सोशल डिस्टन्स चे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी
जि.प.गटनेते व तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते शहिद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी भरत कोळी, अनिल कोळी ,जांलदर कोळी, अमर कोळी, गोकुळ तायडे (मनवेल ),निमगाव येथील पोलीस पाटील प्रमोद तावडे, बाळु कोळी, इम्ररान पहेलवान,काँग्रेस शहर अध्यक्ष कदीर खान,नईम शेख सह समाज बांधव उपस्थित होते.
प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी जागतिक आदीवासी दिन व हुतात्म दिनाबाबत विशेष माहीती दिली. प्रास्तविक व सुत्रसंचालन जांलदर कोळी यांनी केले आभार भरत कोळी यांनी मानले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *