
एलसीबी ने जप्त केला अवैध मद्याचा साठा, एक जण ताब्यात
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). देशात लॉक डाऊन परिस्थिती असताना शहरातील रस्ते ओस पडले आहे.घरात लपविलेला मद्य साठा करून त्याची जादा दराने विक्री करण्यात येत आहे अशी माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक तयार करून चाळीसगाव रोड शंभर फुटी रस्ता पवन नगर येथे राहणारा श्रावण कचरु कांबळे यांचे घरात छापा टाकला यावेळी त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली.घराची पोलीसांनी तपासणी केली असता घरात लपवून ठेवलेला विना परवाना बेकायदा इंग्लिश दारू विक्री करतांना मिळुन आला असता त्याच्यावर छापा घालून एकूण 36 हजार 445 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अपर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ मार्गदर्शनाने
स्था.गु.शा.पो.नि. शिवाजी बुधवंत व पो.ना. श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, कुणाल पानपाटील , उमेश पवार अशोक पाटील, पो.कॉ. रविकिरण राठोड, विशाल पाटील मयुर पाटील तुषार पारधी विलास पाटील आदी केलेली आहे.