यावल शहरात इंग्लिश दारू सह 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Featured नंदुरबार
Share This:

लॉक डाऊन मध्ये देशी-विदेशी मालाची विक्री झालीच कशी ?

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील) यावल शहरात बोरावल गेट परिसरातून काल दिनांक 9 गुरुवार रोजी यावल पोलिसांनी एका मोटरसायकल सह एकूण 16 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला असला तरी लॉकडाऊन च्या गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात सर्व बियरबार व वाइन सेंटर बंद असताना यावल तालुक्यात सह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात देशी-विदेशी दारू अनेक ठिकाणी अवैध रित्या खुलेआम विक्री झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात बोलले जात आहे.

8 जुलै 2020 पासून मद्य साठा घेण्यास आणि मद्य विक्रीस परवानगी.

नमुना – एफएल-111 तसेच नमूना – ई व ई-2 अनुज्ञप्तीना नवीन मद्य साठा घेण्यास व लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत त्यांना सीलबंद मद्य विक्री करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. तरी सदर शासन आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी तसेच यापूर्वी संदर्भीय शासन पत्राच्या अनुषंगाने या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व मार्गदर्शक तत्वे पाळणे बंधनकारक राहील सदरील दोन्ही शासन अधिसूचना संबंधित अनुज्ञप्ती धारकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत तसेच एफएल-1 अनुज्ञप्तीना आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात असे महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिनांक 8 जुलै 2020 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, ( वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली वगळून ) सर्व विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सर्व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना एका लेखी आदेशान्वये कळविले आहे त्यामुळे आता दिनांक 9 जुलै 2020 पासून उपरोक्त आदेशानुसार सर्व एफ एल-3 (हॉटेल)अनुज्ञप्ती धारक आपल्या अनुज्ञप्तीमध्ये नवीन मद्यसाठा एफ एल-1 (ट्रेड) घटकांकडून खरेदी करू शकतात. यामुळे मद्य विक्री करणाऱ्यांमध्ये कायदेशीर रित्या एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संध्याकाळी 17:45 वाजेच्या सुमारास बोरावल गेटजवळ सार्वजनिक जागेवर बंडू सुकलाल पाटील व गणेश शहाजी शिर्के राहणार बोरावल गेट अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने यावल पोलीस त्या ठिकाणी तात्काळ जाऊन त्यांचे ताब्यातील ऑफिसर चॉइस कंपनीच्या 180 एम. एल.मापाच्या 9 सीलबंद इंग्लिश दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत रुपये 650, तसेच 15 हजार रुपये किमतीची एक हिरो डीलक्स कंपनीची मोटरसायकल,आणि 540 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या 180 एम. एल. मापाच्या 9 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 16 हजार 190 रुपयाचा माल जप्त करून गु.र.नं. 66 / 2020 कलम 65 ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी हे करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *