यावल शहरातील अनेक भागात गावठी व देशी दारूची सर्रास विक्री

Featured जळगाव
Share This:

यावल शहरातील अनेक भागात गावठी व देशी दारूची सर्रास विक्री.

जिल्ह्यात फक्त यावल येथे अनाधिकृत मिनीडोअर रिक्षा प्रवासी वाहतूक.सोशल डिस्टन्स खड्ड्यात.

यावल भुसावल 50 ते 60 रुपये प्रति प्रवासी भाडे घेऊन आर्थिक लूट.

यावल ( सुरेश पाटील): यावल शहरात ठिक- ठिकाणी प्रमुख रस्त्यावर आणि गल्लीबोळात देशी दारू आणि गावठी दारू सर्रासपणे खुलेआम विक्री होत आहे तसेच जिल्ह्यात फक्त यावल येथे(मिनीडोअरची कालमर्यादा आणि क्षमता संपलेली असल्यावर सुद्धा)यावल भुसावल मार्गावर अनधिकृतपणे मिनीडोअर मधून वाजवीपेक्षा जास्त म्हणजे 12 ते 13 प्रवासी कोंबून कोरोना नियमाचे उल्लंघन करून प्रति प्रवासी 50 ते 60 रुपये यावल भुसावळ भाडे आकारुन प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे याकडे यावल पोलिसांसह आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
यावल शहरात बोरावल दरवाजा परिसरात भिलवाड्यात, आठवडे बाजारात,बाहेरपुऱ्यात, रेणुका देवी मंदिराजवळ,महाजन गल्लीत,सुतार गल्लीत रस्त्यावर मेन रोडवरील मुख्य चौकात देशी विदेशी दारू सह गावठी दारू पंडित सर्रासपणे विक्री होत आहे, कोरोना विषाणूची लागण जोरात सुरू असून सुद्धा अवैध धंद्यांच्या ठिकाणी तसेच चोपडा रोडवरील जुन्या पेट्रोल पंपाच्या समोर देशी दारूच्या दुकानात मद्यपी मूखपट्टी न लावता सोशल डिस्टन्स न ठेवता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात गर्दी आणि आरडाओरड मुळे इतर नागरिकांना महिलांना रस्त्याने येताना आणि जाताना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध धंदे करणाऱ्यांपैकी 50% अवैध धंदे वाईक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांचे खास समर्थक असल्याने हे म्हणतात की पोलीस आमचे काहीच करू शकत नाही आमचे धंदे कधीच बंद होणार नाही असे स्पष्ट उघडपणे बोलत असतात.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *