
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची 50 टक्के उपस्थितीचे आदेश असताना केंद्र प्रमुखाकडून पायमल्ली,मनमानीतालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची 50 टक्के उपस्थितीचे आदेश असताना केंद्र प्रमुखाकडून पायमल्ली,मनमानी
तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी.
यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय पुणे यांचे दि.14जून2021चे आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य राहील असे आदेश असताना मात्र यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रातील शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख मात्र यावल तालुक्यातील जिल्हा परिषद सर्व शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करीत असल्याने तालुक्यातील शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद जळगाव शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दि.16जून2021रोजी जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यक्षेत्रातील गटशिक्षण अधिकारी तसेच जिल्ह्यातील मनपा/नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की,राज्यातील प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि.14 जुन2021पर्यंत उन्हाळी सुटी जाहिर करण्यात आली होती.त्यानुसार दि.15जुन2021पासुन राज्यातील(विदर्भ वगळता)शाळांचे शैक्षणिक वर्ष सन2021-22सुरु करण्यात येत आहे.शाळा मध्ये/कनिष्ठ महाविद्यालय मध्ये पुढील शिक्षकांची उपस्थिती आवश्यक राहील.
१)इयत्ता1ते9वी व इयत्ता11वी चे50 टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
२)इ.10वी इ.12वी चे100टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
३)शिक्षकेत्तर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.
४) प्राथमिक,माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी100 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
इ.10वी इ.12वी चा निकाल तयार करण्यासाठी मुल्यांकनाचे काम सुरु असुन मर्यादित वेळेत सदर निकाल घोषित करावयाचा असल्याने इ.10वी, इ.12वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांची100टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.या बाबत सर्व संबंधीत व्यवस्थापनांना सुचना निर्गमीत कराव्यात.
कोविड-19परिस्थितीमुळे पुढील सुचने पर्यंत शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,(एस.सी.ई.आर.टी.)यांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातुन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत पणे सुरु राहील याची दक्षता सर्व संबंधीतांनी घ्यावी.याबाबत अधिनस्त सर्व क्षेत्रीय यंत्रणंना वरील प्रमाणे निर्देश देण्यात यावे व केलेल्या कार्यवाही अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.असे दिलेल्या स्पष्ट आदेशात जिल्हा परिषद जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी म्हटले आहे. असे असताना यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रातील केंद्रप्रमुख यावल तालुक्यातील अनेक शिक्षकांना शाळेमध्ये शंभर टक्के उपस्थिती देण्याची सक्ती का करीत आहे याची चौकशी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी करावी असे यावल तालुक्यातील अनेक शिक्षकांकडून मागणी होत आहे. या आदेशाच्या प्रती माहितीस्तव १)म.जिल्हाधिकारी,जळगांव(२)म.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव(३)म.शिक्षण उपसंचालक,नाशिक विभाग नाशिक.यांना दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.