आलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही ? वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा

Featured जळगाव
Share This:

आलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा की नाही ?

वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा.

यावल (सुरेश पाटील): डेंगू पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याचा अहवाल असताना प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप अशी घटना घडल्याने डॉक्टरांनी आलेल्या पेशंटवर औषधोपचार करायचा नाही का?याबाबत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
व्याधीमुळे किंवा इतर कोणत्याही आजारामुळे औषधोपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे पेशंट आल्यास त्याच्यावर औषध उपचार करायचा किंवा नाही? तसेच त्या पेशंटला ऍडमिट करून घ्यायचे किंवा नाही? याबाबत आता खुद्द वैद्यकीय क्षेत्रात आणि अनेक नागरिकांमध्ये समाजात वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.कारण एखाद्या वेळेस संबंधित रुग्णाची पेशंटची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे किंवा पेशंटचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास डगमगणारा,किंवा औषधोपचारावर संशय आणि विश्वास नसल्यास,पेशंटचे बॅडलक असल्यास काही अप्रिय घटना घडल्यास त्याला संबंधित वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर जबाबदार राहतील का?
एखाद्याला हार्ट अटॅक आल्यास तो उपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही तर काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर दगावतात तर काही रुग्णांना फायदा होतो हे ज्याच्या त्याच्या प्रतिकार शक्तीवर,शारीरिक क्षमतेवर, आणि त्याच्या नशिबावर/ लकवर,योगावर अवलंबून असते. यात डॉक्टर,वैद्यकीय अधिकारी हे फक्त औषधोपचार शस्त्रक्रियेच्या माध्यमातून निमित्त मात्र असतात.डॉक्टर जाणून-बुजून कधीही चुकीचा औषधोपचार करीत नाही,रुग्णाचे आरोग्य हे त्याच्या व्याधी नुसार त्याला प्रतिसाद देत असतात.
आतापर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक अप्रिय घटना घडलेल्या आहेत कोरोना विषाणू कालावधी तर अनेकांची वैद्यकीय सेवा,आर्थिक,शारीरिक क्षमता/ प्रतिकारशक्तीचा अनेकांना फायदा न होता जीव गमवावा लागला आहे म्हणून अशा घटनांना वैद्यकीय क्षेत्राला किंवा डॉक्टरला दोषी ठरवायचे का?इत्यादीअनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *