
धुळ्यातील कोरोना रुग्णानंतर कुठे काय? जाणून घ्या
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे महानगरपालिका क्षेत्रामधील तिरंगा चौक परिसरामध्ये एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने त्या भागातील 1.5 कि.मी. चे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यांत आले असून त्याला लागून असलेला 3 कि.मी.चे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित केलेले आहे.
कंटेनमेंट क्षेत्रामध्ये नटराज टॉकीज 80 फुटीरोड क्रॉसिंग पासून डि पी रस्त्याने कॉटन मार्केट पारोळा रोड ते दक्षिणेकडे वाखारकर नगर ते नवीन पेट्रोलपंप पावेतो तसेच अरिहंत मंगल कार्यालय व अलंकार सोसायटी परिसर तसेच वडजाई रस्त्या लगत मायक्रो पाण्याची टाकी ते 100 फुटी रस्त्याने चाळीसगाव रोड लोकमान्य हॉस्पिटल तसेच ग.नं.7 पारोळा रोड कॉसिंग ते गिदोडिया हायस्कूल नटराज टॉकीज पावेतोचे क्षेत्र पूर्ण सिल करण्यांत आले आहे.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर व इतर व्यक्तींना होमक्वांरटाईन करण्यांत येत असून रुग्णाने तिरंगा चौक परिसर व गजाजन कॉलनी तील ज्या खाजगी दवाखान्याशी संपर्क केलेला आहे त्यांनाही सिल करण्यांत आले आहे.
सदर रुग्णाची हिस्ट्री शीट तपासण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची व नागरिकांची तातडीने तपासणी करता येणार आहे तसेच धुळे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण क्षेत्रात रसायन फवारणी व थर्मल स्कॅनर द्वारे भागातील नागरिकांची तपासणी सुरू करण्यात येणार आहे
धुळे महानगरपालिके मार्फत त्या क्षेत्रात शासन निर्देशाप्रमाणेआवश्यक त्या उपाययोजना प्रतिबंधात्मक कार्यवाही युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली असून नागरिकांनी घाबरून न जाता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान धुळे महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे