यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि शहर अभियंता कामाच्या ठिकाणी उपस्थित नसताना ठेकेदाराचे काम सोयीनुसार मर्जीनुसार निकृष्ट दर्जाचे सुरू!

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि शहर अभियंता कामाच्या ठिकाणी उपस्थित नसताना ठेकेदाराचे काम सोयीनुसार मर्जीनुसार निकृष्ट दर्जाचे सुरू!

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाची पायमल्ली.

यावल (सुरेश पाटील): नगरपरिषद हद्दीत विकसित भागात HDPE पाईप लाईनवर जुनी नळ कनेक्शन स्थलांतरित करण्याचे जे काम अमळनेर येथील ठेकेदाराकडून सुरू आहे त्या कामाच्या ठिकाणी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी किंवा शहर अभियंता समक्ष उपस्थित नसतांना ठेकेदार सदरचे काम मंजूर प्लॅन एस्टिमेट प्रमाणे न करता निकृष्ट प्रतीचे करीत असल्याने विकसित कॉलन्यामध्ये नागरिकांमधे मोठा तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे,या कामात जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यते नुसार आणि यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिलेल्या कार्यादेशानुसार काम होत नसल्याने ठेकेदाराकडून आदेशाची पायमल्ली होत असल्याने ठेकेदाराने करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याने अनामत रक्कम जप्त करुन तसेच काम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न केल्यामुळे पुढील कार्यवाही करावी असे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषद हद्दीत विकसित कॉलनी भागात नवीन टाकण्यात आलेल्या एचडीपीई पाईप लाईनवर जुने नळ कनेक्शन स्थलांतरित करणेबाबत अंदाजित25लाख66 हजार200रुपयाच्या कामाला जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.30/3/2021रोजी महत्वाच्या अटी व शर्ती टाकून प्रशासकीय मान्यता दिलेली होती आणि आहे त्यानुसार यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दि.3/5/ 2021रोजी कार्यत्तर मंजुरीस अधीन राहून दिलेल्या मंजुरी अन्वये15वा वित्तआयोग योजनेअंतर्गत यावल नगरपरिषद हद्दीतील कॉलनी भागात नवीन टाकण्यात आलेल्या एचडीपी पाईप लाईनवर जुनी नळकनेक्शन स्थलांतरित करणे या कामाची निविदा अंदाजपत्रकीय रक्कम रुपये22लाख 91हजार250रुपये मंजूर करून अमळनेर येथील एस कुमार कन्स्ट्रक्शनला कार्यादेश दिलेला होता आणि आहे,त्यानुसार जुनी नळ कनेक्शन स्थलांतरित करण्यात आली.
या कामाच्या आधी वाढीव हद्दीत एचडीपीई पाईप लाईन टाकणेच्या कामासाठी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी अंमळनेर येथीलच एस कुमार कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला3कोटी17लाख62 हजार 315रुपयाचा कार्यादेश दिलेला होता आणि आहे,हि वरील दोघं कामे करताना यावल नगरपरिषद हद्दीतील वाढीव हद्दीत पाईप लाईन टाकलेल्या विकसित भागात रस्ते खोदल्यामुळे रस्त्यांची पूर्ण दयनीय अवस्था झालेली होती आणि आहे परंतु पाईप लाईन टाकलेल्या ठिकाणचे दुरुस्तीचे काम ठेकेदाराने न केल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे आणि स्पीड ब्रेकर तयार झालेले आहेत(आता काही ठिकाणी दुरुस्ती सुरू झालेली आहे ती पण थातूरमातूर निकृष्ट प्रतीची दुरुस्ती करण्यात येत आहे) त्यामुळे रस्त्यावरून पायदळ चालणे आणि दुचाकी-चारचाकी वाहने चालवणे सुद्धा मुश्किल झालेले होती आणि आहे ही दोन्ही कामे सुरू असताना यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता कामाच्या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे किंवा प्रत्यक्ष काम कसे सुरू आहे याबाबतची पाहणी न केल्यामुळे यावल नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले,त्याचा विपरीत परिणाम विकसित भागातील नागरिकांच्या रहदारीस मोठा अडथळा निर्माण होऊन मनस्ताप झालेला आहे, ठेकेदाराने ही कामे करतानाच मंजूर प्लॅन एस्टिमेट प्रमाणे तात्काळ दुरुस्त केली असती तर कामाबाबत प्रश्न उपस्थित राहिले नसते तरी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि बांधकाम शाखा अभियंता यांनी आता जे दुरुस्तीचे काम सुरू आहे ते उत्कृष्ट प्रतीचे गुणवत्ता पूर्वक करून घ्यावे आणि असे न केल्यास ठेकेदारांने कार्यारंभ आदेशातील अटी-शर्ती आणि जिल्हाधिकारी जळगाव तसेच यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली म्हणून ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून पुढील योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे संघटक तथा भारतीय जनसंसद जळगाव जिल्हा अध्यक्ष आणि पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांच्यासह संपूर्ण यावल शहरातून आहे.
ठेकेदाराने सदरची कामे करण्यासाठी मजुरांची यंत्रणा उभी केली आहे या यंत्रणेतील काही मजूर आणि मजुराचे प्रमुख आणि नगरपालिकेतील एक कर्मचारी विकसित भागातील नागरिकांना महिलांना कामात अडथळा निर्माण करू नका नाहीतर तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा दम भरीत आहे या सर्व प्रकाराकडे अमळनेर येथील ठेकेदार एस कुमार कंट्रक्शन यांचे आणि नगर परिषदेतील अनेक नगरसेवकांची, विरोधी गटाची गप्प राहण्याची भूमिका असल्याने सर्व यंत्रणेची हातमिळवणी असल्याचे सुद्धा संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *