Weather forecast

हवामानाचा अंदाज : यंदा देशात चांगला पाऊस

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क) : कोरोना विषाणू संकट, लॉकडाऊन यामुळे वैतागलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यंदा देशात सरासरी चांगले पर्जन्यमान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. भारतात साधारपणे जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. त्याआधी दोन ते तीन वेळा हवमानशास्त्र विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. बुधवारी पहिला अंदाज वर्तविण्यात आला आहे.

देशात गेल्यावर्षी अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. महाराष्ट्राच्या अनेक भागांत गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सध्याही अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये पडतो. जून ते सप्टेंबर हा काळ देशात मान्सूनचा असतो.
देशातील खरीपाच्या पिकांसाठी मान्सूनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तांदूळ, ऊस, गहू, डाळी या स्वरुपाच्या पिकांसाठी मान्सून पुरेशा प्रमाणात पडणे महत्त्वाचे असते. असे असताना हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *