
शिरपूर : एस.टी.चे अधिकारी व कर्मचारी कोरोंना योध्चेच – सी.ओ.अमोल बागुल
शिरपूर (प्रतिनिधि) – कोरोंना संकटात आम जनता घरात राहून सहकार्य करीत आहे तर डॉक्टर, पोलिस, एस. टी. चे चालक, वाहक व सर्व स्टाफ तसेच न. पा. चे संपूर्ण स्टाफ व सफाई कर्मचारी व सी ए ए ग्रुप हे कोरोना विरुद्ध लड़ाईत कोरोना योद्धाच आहेत असे गौरपूर्ण उल्लेख शिरपूर नगर परिषद् चे मुख्याधिकारी अमोल बागुल यानी काढले.
शिरपूर एस टी डेपो येथे सी ए ए ग्रुप चे माध्यमातून सूमारे ५०० एस. टी. स्टाफ चे कुटुंबाला आर्सेनिक अलबम ३० हे होमियोपैथिक औषध वितरित करनेत आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी ते मार्गदर्शन करत होते. डेपो मैनेजर श्रीमती वर्षा पावरा यांनी कार्यक्रम संयोजन केले होते. सी ए ए ग्रुप चे हेमराज राजपूत यानी प्रस्तावनेत हे होमियोपैथि औषध शहर व तालुक्यात हजारों व्यक्ति ना वितरित केले असे सांगून सी ए ए ग्रुप ची समाज सेवाकार्य विदित करून एस.टी.कर्मचारी, अधिकारी देखील देशसेवा करीत आहे हे नमूद केले व डॉ योगेश जाधव यांचा देवदूत असा उल्लेख केला.
डॉ योगेश जाधव यानी औषध सेवनविधि व काय सतर्कता ठेवावी याचे सविस्तर विवेचन केले व कॉरॉना संक्रमण रोखण्यासाठी वाहक चालक यांनी विशेष काय सावधगीरी अंगीकारावी हे विषद केले. व हा उपक्रम आयोजित करने साठी वरवाडे येथील भैया माळी व राहुल देवरे यांचे सहयोगचे विशेष उल्लेख केला.
या प्रसंगी डॉ चेतन पाटील यानी वैयक्तिक स्वच्छता, प्रवसात घ्यायची दक्षता, सैनिटाइजर चे वापर व आपल्या सह कुटुंबा ची सुरक्षा संबंधी उपयोगी माहिती दिली. नेत्ररोग तज्ञ डॉ राखी अग्रवाल यानी ही प्रवासात डोळ्यांची निगा कशी राखावी व डोळे ही कोराना संसर्ग चे सवेंदशिल सोर्स असल्याचे चे सांगितले.
या वेळी डॉ मनोज परदेसी, ड्रगिस्त, केमिस्ट यूनियन चे अशोक बाफना, भय्या माळी ,राहुल देवरे, सी ए ए ग्रुप चे राजेश मारवाड़ी , हेमराज राजपूत, डेपो मैनेजर श्रीमती वर्षा पावरा, ए टी एस मनोज पाटील, आय टी प्रीति पाटील अधिकार, कर्मचारी उपस्थित होते.प्रस्तावना हेमराज राजपूत, सूत्र संचालन राजेश मारवाड़ी व आभार ए टी एस मनोज पाटील यानी मानले.