
विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे हिरालाल चौधरी यांच्या हस्ते सत्कार
विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे हिरालाल चौधरी यांच्या हस्ते सत्कार
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : पत्रकारांच्या विविध समस्या असून कोरोना काळात अनेकांना अडचणी आल्या. आगामी काळामध्ये पत्रकारांना एकजूट करण्याचा प्रयत्न राहील. आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे लढा देऊ, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी केले. विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने आयोजित गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय सरचिटणीसपदी निवड झाल्याने त्यांचा पत्रकार बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, जेष्ठ पत्रकार देवेंद्र बोरसे, गजेंद्र शिंपी, मनोज शेलार, रणजित राजपूत, बाबासाहेब राजपूत, निलेश पवार, रविंद्र चव्हाण, धनराज माळी, राकेश कलाल, सुनिल कुलकर्णी, केतन रघुवंशी, भिकेश पाटील, गौतम बैसाने, दिनेश गावित, ज्ञानेश्वर माळी, जगदिश ठाकूर, वैभव करवंकर, उमेश पांढारकर, कल्पेश मोरे, अनिल राठोड, सूर्यकांत खैरनार, महेश पाटील, जीवन माळी, जितेंद्र जाधव, ज्ञानेश्वर गवळे, दिनेश मोरे, रामचंद्र बारी, सचिन वरसाळे, महेंद्र चित्ते, आदी उपस्थित होते.
यावेळी हिरालाल चौधरी यांनी सांगितले की, सद्यस्थितीत पत्रकारांना बिकट समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे समस्या सोडविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असून पत्रकारांना एकजूट करण्याचा प्रयत्न राहील. सर्व वरिष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन घेतले जाईल. विशाल माळी यांना लवकरच जिल्हा पातळीवर मोठे पद देऊन त्यांचे पत्रकार संघासाठी योगदान लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. विशाल माळी यांनीही सत्काराला उत्तर देतांना पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रास्ताविक गजेंद्र शिंपी तर आभार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदिश सोनवणे यांनी मानले.