शासनाच्या राज्य भाषाविषयक कायद्याच उल्लंघन- मराठी एकीकरण समितीने वेधले राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे लक्ष

Featured जळगाव
Share This:

शासनाच्या राज्य भाषाविषयक कायद्याच उल्लंघन. मराठी एकीकरण समितीने वेधले राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे लक्ष.

गावाच्या नावात झाला होता अपभ्रंश

यावल (सुरेश पाटील):राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील गावाच्या नावात अपभ्रंश व चुकीच्या नावाने लावलेल्या फलका बाबत मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिलेदार प्रतिनिधी जळगाव अध्यक्ष जितेंद्र कोळी यांनी राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाकडे लेखी तक्रार देऊन लक्ष वेधले होते त्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून फलकावरील गावाच्या नावात दुरुस्ती करण्यात आली.
जळगाव-पाचोरा-भडगाव राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ जे वरील गावाच्या नावाच्या अपभ्रंश व चुकीच्या नावात लावलेल्या फलकाबाबत,मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिलेदार प्रतिनिधी जितेंद्र कोळी(अध्यक्ष जळगाव)यांनी हरकत दर्शविली,शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली समितीच्या वतीने शासनाच्या राज्यभाषा विषयक कायद्याच उल्लंघन होत असल्याचे तक्रारीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग धुळे विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली,मागील2ते3 महिन्यांपासून पाठपुरावा करीत सदर प्रकरणी बदल करावयास भाग पाडले याबाबतीत कार्यवाही करीत महामार्ग प्रशासनाने चुकीचे नाव/नावाचा अपभ्रंश असलेले सर्व फलक आपल्या मराठी राज्यभाषेत उपलब्ध करून दिलेत व झालेल्या चुकीत सुधारणा करीत राज्यभाषा मराठीचा मान राखला.याबाबत चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील मराठी एकीकरण समिती च्या या कार्याला पाठींबा देत लेखी पाठपुरावा केला आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्याच्या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले,मराठी अस्मितेच्या लढ्यात मा.आमदारांनी साथ दिली याबद्दल कोळी यांनी त्यांचे देखील आभार मानले.
राज्यभर असलेल्या सर्व महामार्गावर आपल्या गावाचे शहराचे नाव महामार्गावर बरोबर लिहले आहे की नाही
राज्य शासनाने,प्रशासनाने खात्री करून घ्यावी,राज्यात100%मराठी भाषा वापर करणेबाबत शासनामार्फत वेळोवेळी परिपत्रक काढले जातात पण त्याबद्दल अंमलबजावणी होताना दिसत नाही,
मराठी एकीकरण समिती मार्फत मराठीसाठी बिगरराजकीय चळवळी मार्फत असेच वेळोवेळी बदल घडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *