
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्याने ग्रामस्थांनी केले स्वागत
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्याने ग्रामस्थांनी केले स्वागत
यावल ( सुरेश पाटील ) : तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अनिल कडू तायडे यांना दिनांक 15/6 रोजी घस्यात त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांचे काका अशोक तायडे यांनी लगेच यावल ग्रामीण रुग्णालय यावल येथे नेऊन तपासणी केली असता डॉक्टर यांनी पुढील तपासणी साठी फैजपूर कोरोना तपासणी सेंटर ला पाठवण्यात आले तिथे त्यांचे शॉप घेऊन ते जळगाव येथे तपासणी साठी पाठवण्यात आले होते दुसऱ्या दिवशी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह त्यांना कोरोनाची लागवण झालेली आहे असे तेथील डॉक्टर यांनी सांगितले व फैजपूर साखर कारखाना येथील आमोदा रोड वरील कोविड सेंटर मधून न्हावी रोड येथील कोविड सेंटर ला पाठवण्यात आले तिथे त्यांची 10 दिवस ट्रीटमेंट करण्यात आली व आज दिनांक 23/6 रोजी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डोंगर कठोरा येथे त्यांच्या घरी ऍम्ब्युलन्स ने पाठवण्यात आले असता गावातील नागरिक समाज बांधव व सरपंच सौ. सुमनबाई वाघ, ग्रामविकास अधिकारी पवार साहेब, क्लर्क प्रदीप पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दिवाकर सरोदे, सदस्य रत्नदीप सोनवणे, व सर्व बौद्ध समाजासह ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व अनिल तायडे यांनी तेथील ट्रीटमेंट संदर्भात घेतलेला अनुभव व्यक्त केला त्यांनी कोविड सेंटर मधील डॉक्टर, सिस्टर, पूर्ण स्टॉप यांचे आभार मानले ते डोंगरकठोरा येथील क्राईम वार्ता जळगाव जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे यांचे पुतणे होत.