धुळे : विलास ठाकूर ला चांगलेच भोवले लाच प्रकरण, संगीता राऊत यांना मिळाला पदभार

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). मोहाडी पोलीस स्टेशन मधील लाच प्रकरण जिल्हात गाजले जिल्हा पोलिस दलात यामुळे एकच खळबळ उडाली यातूनच सपोनी विलास ठाकूर यांची तडकाफडकी कंट्रोलला बदली करण्यात आली. लाच प्रकरण चांगलेच भोवले अशी चर्चा सध्या जिल्हा पोलिस दलात रंगलेली दिसली.
धुळे येथील मोहाडी उपनगरातील आयएसओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी 40 हजाराची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो (नाशिक) पथकाने त्यांना अटक केली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला भेट दिली होती त्यावेळी सपोनि विलास ठाकूर हे कार्यरत होते परंतु रात्रीतून त्यांची मोहाडी पोलीस स्टेशन मधून उचलबांगडी करून त्यांना कंट्रोल रूम ला देण्यात आले व त्यांच्या जागी प्रभारी सपोनि संगीता राऊत यांना कार्यभार सोपवण्यात आलाय या अगोदर संगीता राऊत यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन ,आझाद नगर पोलीस स्टेशन याभागात कामगिरी बजावली होती. त्यांना मोहाडी पोलिस स्टेशन प्रभारी पोलिस पदाचा पदभार देण्यात आलेला आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *