विकास दुबे एन्काऊंटर : जेव्हा 8 पोलीस शहीद झाले, तेव्हा कुठे होते मानवाधिकारवाले : प्रदीप शर्मा
मुंबई (तेज समाचार डेस्क). कानपूरमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणासह 60 पेक्षा अधिक गुन्हे असलेला कुख्यात गुंड विकास दुबे याचा चकमकीत खात्मा झाला. एन्काऊंटरप्रकरणी विविध प्रतिक्रिया येत आहेत. विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी मुंबईत एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असेलेल माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचं समर्थन केलं आहे. शर्मा म्हणाले कि मला वाटतं हा खराखुरा एन्काऊंटर आहे. 8 पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? आता पोलिसांनी एन्काऊंटर केल्यावर लगेच हे कार्यकर्ते समोर येत आहेत, असं प्रदीप शर्मा यांनी म्हटलंय.
दरम्यान, पोलिसांनी काही चांगलं काम केलं की लगेचच काही लोक प्रश्न उपस्थित करतात, असंही प्रदीप शर्मा यांनी म्हणाले आहेत.