यावल कृऊबा समितीचे सहाय्यक सचिव विजय कायस्थ सेवानिवृत्त

Featured जळगाव
Share This:

यावल कृऊबा समितीचे सहाय्यक सचिव विजय कायस्थ सेवानिवृत्त.

संचालक मंडळाकडून निरोप व शुभेच्छा

यावल ( सुरेश पाटील): यावल कृउबासचे सहाय्यक सचिव विजय रामकृष्ण कायस्थ हे दि.31मे2021 रोजी आपल्या36 वर्षाच्या प्रदिर्घ सेवे नंतर सहाय्यक सचिव या पदावरून सेवानिवृत्त झालेत.
शिपाई या पदापासून त्यांनी आपली प्रदिर्घ सेवेला प्रारंभ केला होता.या आपल्या अखंड 36 वर्षाच्या बाजार समिती सेवेत शिपाई,लिपिक, लेखापाल,निरिक्षक ते सहाय्यक सचिव ही पदे त्यांनी कर्तव्य दक्षता बाळगून बाजार समितीची यशस्वीरित्या पार पाडली.काही वर्ष त्यांनी प्रभारी सचिवपदही सांभाळून बाजार समितीत एक मानाचे पद व स्थान निर्माण केले होते.त्यांच्या या सेवानिवृत्त बद्दल त्यांचा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे वतीने चेअरमन तुषार उर्फ मुन्ना पाटील तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणि विरावली ग्रामपंचायत सरपंच,यावल तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील,संचालक नारायणबापु चौधरी,अशोक चौधरी, राकेश फेगडे,सुनिल बारी,सत्तार तडवी व सचिव एस.बी.सोनवणे  आदि मान्यवरांच्या हस्ते विजय कायस्थ यांचा सपत्निक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बाजार समितीचे लेखापाल वाय.एम.चौधरी,निरिक्षक के.जे.सोनवणे,लिपिक एन.पी.बारी, व्ही.ए.भालेराव,के.एन.तडवी,डि.यु. महाजन,डी.जी.चौधरी,व विनित कोलते,विनोद सोनवणे,शकील तडवी,रेखा भामरे,चंदन बारी व इतर कर्मचारी सोशल डिस्टिंगचे अंतर ठेवुन उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *