
‘विजय’ हस्तलिखित मासिकाचे प्रकाशन सोहळा संपन्न
‘विजय’ हस्तलिखित मासिकाचे प्रकाशन सोहळा संपन्न
धुळे (तेजसमचार प्रतिनिधि): धुळ्यातील जो रा सिटी हायस्कूलमधील सभागृह आज मंगळवारी दुपारी ‘विजय’ हस्तलिखित प्रकाशन करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत 86 व्या ‘विजय’ हस्तलिखीत मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
जो रा सिटी हायस्कूल सभागृहात सरस्वती व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व प्रतिमा पूजन करूनकार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर, पोलीस उपनिरीक्षक विजया पवार मुख्याध्यापक ऐ डी पावरा, उपमुख्याध्यापक एक जी जोग, निरीक्षक एस आर गोसावी, शिक्षिका सिमा डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार गुलाब पुष्प धारण पुस्तक देऊन करण्यात आला.
शहर पोलीस उपनिरीक्षक विजया पवार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे हस्तलिखितातील मजकूर पाहून कौतुक केले. तुम्ही विद्यार्थी उद्याचे देशाचे चांगले नागरिक होऊ शकतात.हस्तलिखित चांगले आहे. रंग पद्धती रंग भरताना विद्यार्थ्यांचे मन कळते. उद्याचा देश कसा असावा ते तुमच्या हाती आहे तुम्ही त्याचे केंद्रबिंदू आहात. आपण सुंदर शहर तुमच्या माध्यमातून घडू शकतो. चांगल्या सवयी आपल्या अंगी बाळगा व्यायाम करा व्यसनापासून दूर रहा मैदानी खेळ खेळा अभ्यासाकडे लक्ष द्या मोबाईल पासून दूर राहा असा सल्लाही यावेळी यांनी दिला.
शहर पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधत हितगुज करत विद्यार्थ्यांच्या मनातील भावना ही जाणून घेतल्या हस्तलिखित प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले मला आपल्यात येऊन आपले बालपण आठवले अशी एक आठवणही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना करून दिली आपल्या वयात असताना मी लायब्ररी जात असेल तेथील पुस्तके वाटत असेल आपणही पुस्तकाचे वाचन केले पाहिजे आपल्यातून एक चांगला नागरिक होऊ शकतो मोबाईल हा चांगला आहे तितकाच तो वाईटही आहे त्याचं योग्य तो वापर करायला हवा विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे शरीरयष्टी जपली पाहिजे.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनीही आपल्या अनुभव हस्तलिखित नमूद केले पाहिजे असेही सांगितले काही झाडे जगवा झाडे जगवा या विषयाकडे लक्ष वेधले विद्यार्थी व पोलीस यांच्यात भीती निर्माण न होता संवाद व्हावा हा हि एक उद्देश होता. प्रत्येक समाजात चांगले वाईट लोक असतात म्हणून नेहमीच वाईट गोष्टी घडतात असे नाही चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहा आणि अपप्रवृत्ती च्यानागरिकांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याची तुम्ही काळजी करू नका असे आश्वासन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.
‘हेल्थ इज वेल्थ’ शरीर चांगले असले तर तुमचे आरोग्यही चांगले राहील. मैदानी खेळ खेळा. च पुस्तक वाचन करा, अभ्यास करा देशाचे चांगले नागरिक बना. आमचा सन्मान केला. आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए आर गोराणे यांनी केले.गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या प्रसंगी एस आर गोसावी, के पी मांडे, एस डी चव्हाण, एम जी वळवी, पी एन कुलकर्णी, वैशाली पोतद्दार, एस पी महिंदळे, आर जी बारे, ए आर पावरा एन व्ही नागरे, बी एस गांगुर्डे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.