बिल काढण्याच्या कारणावरून ठेकेदार आणि बिडिओमध्ये शाब्दिक चकमक

Featured जळगाव
Share This:

बिल काढण्याच्या कारणावरून ठेकेदार आणि बिडिओमध्ये शाब्दिक चकमक.

यावल (सुरेश पाटील): पंचायत समिती यावल कार्यालयातून कामाचे बिल काढणे संदर्भात यावल तालुक्यातील एका ठेकेदारआणि यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने संपूर्ण यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीने लक्ष केंद्रित केल्याने प्रकरण पंचायत समितीच्या बाहेर गेले नाही परंतु सदर चे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.
यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात अनेक विकास कामे करण्यात आली आणि काही कामे सुरू आहेत घरकुल प्रकरणे,गोठे प्रकरणे इत्यादी सह अनेक योजनाचे व पंचायत समिती स्तरावरील अनेक बांधकामे सुरू आहेत कामाची गुणवत्ता कशी आहे हे सर्व राजकारणाला आणि समाजाला ज्ञात आहे विविध कामांची बिल काढतांना मात्र संबंधित काही ठेकेदार आणि गटविकास अधिकारी किंवा संबंधित कर्मचाऱ्याची आपापसात बऱ्याच वेळेला शाब्दिक चकमक उडत असते यामागील कारण काय याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी यावल पंचायत समिती आवारात व्हिडिओ आणि त्या ठेकेदार मध्ये कोणत्या कारणावरून शाब्दिक चकमक उडाली याबाबत राजकारणात आणि समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *