कत्तलीसाठी गोवंश वाहणारे वाहन पोलीसांच्या ताब्यात- विवरा पोलिस चौकी जवळ निंभोरा पोलिसांची कारवाई

Featured जळगाव
Share This:

कत्तलीसाठी गोवंश वाहणारे वाहन पोलीसांच्या ताब्यात – विवरा पोलिस चौकी जवळ निंभोरा पोलिसांची कारवाई

यावल ( सुरेश पाटील ): मागील काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन ला खिर्डी परिसरातील गोरक्षकांनी गो-वंशाची क्रुरपने वाहतूक थांबवावी व काही चौकामधे फिक्स पॉइंट मिळण्याबबत निवेदन होते . त्याची दखल घेता निंभोरा पोलिसांनी आज रोजी विवरा पोलीस चौकी समोर, रावेर सावदा रोडवर निंभोरा पो. स्टे.चे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

सविस्तर वृत्त असे की,दि.31 च्या रात्री विवरा पोलीस चौकी समोर, रावेर सावदा रोडवर निंभोरा पोलीस स्टे चे कर्मचारी पो.कॉ. गणेश गायकवाड, पोलिस हवालदार राजू कुमावत, पोलिस हवालदार अश्रफ शेख ,पो.काँ. ईश्वर चव्हाण,पो.कॉ.संदीप पाटील व होमगार्ड अमोल अजलसोंडे,खेमचंद महाले,लक्ष्मण गाढे, सपकाळे असे रात्री 11.00 ते 05.00 च्या नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करीत असताना कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री पावती तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रा शिवाय गोवंश जातीचे 6 गोऱ्हे 1 बैल,बेकायदेशीर पणे गाडीत कोंबून अत्यंत क्रूरतेने त्यांचे गळ्या भोवती व पाय दोरीच्या साहाय्याने बांधून कत्तलीसाठी वाहतूक करतांना मिळून आले असता,आरोपी शेख युसूफ शेख अलीमवय रा.रसलपूर, रावेर , शेख समीर शेख शकील,रा.नागझिरी रावेर,अब्दुल अकील अब्दुल शकील, रा रावेर,आसिफ खान,साबीरखान,नागझिरी रोड, रावेर,शेख शहाबाज शेख नूरा,रा विक्की चौक रावेर 31/07/2020 रोजी सकाळी 03.30 वा.चे सुमारास विवरा बस स्टँडवर पोलीस चौकी समोर रोडवर तपासनी करत असताना1,60,000/- रू.किं.चा एक महिंद्रा बोलेरो पिकअप MH 19 BM 1499 जु.वा.किं.अं 1,20,00/- रु.की चा एक टाटा ace कंपनीचा छोटा हत्ती गाडी नं.MH 19 S 8669 किंमत 41, 200/- रू.किं.चे 6 गोऱ्हे व एक बैल एकूण किंमत- 3,21,200 आढळून आले असता ,निंभोरा पोलीस स्टेशन भाग 05 गु. र. नं.-31/2020 भादंवि कलम- 429,34 सह महा. पशु संवर्धन अधि-5अ, ब,9, महा.पशु क्रूरता अधि.11 चे (1)(A)(F)(H)(K)(I) महा पोलीस अधि.1951 चे क 119, महा पशु वाहतूक अधि-47,48, 49(अ) मोटार वाहन कायदा क 83/177, पो.कॉ. गणेश सुखराम गायकवाड, निंभोरा पो स्टेशन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.नरेंद्र पिंगळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर भाग, मा.सपोनि महेश जानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *