वरुण धवनच्या गर्लफ्रेंडने तीन-चार वेळा दिला होता नकार

Featured देश
Share This:

 

पुणे  (तेज समाचार डेस्क): नव्या पिढीतील वरुण धवनने (Varun Dhawan) मनोरंजक चित्रपट देऊन बॉलिवुडमध्ये चांगलेच यश मिळवले आहे. अर्थात यात त्याचे वडिल प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचाही मोठा वाटा आहे. वरुण धवनने अनेक नायिकांबरोबर काम केले असले तरी त्याचे कुठल्याही नायिकेबरोबर नाव जोडले गेले नाही. आणि याचे कारण आहे त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal). वरुणने नताशासोबत रिलेशनमध्ये असल्याचे कधीही लपवले नाही. त्याने दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एवढेच नव्हे तर अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्रही दिसले होते. परंतु नताशाच्या मागे लागलेल्या वरुणला नताशाने तीन ते चार वेळा नकार दिला होता.

पण वरुणने हार मानली नाही आणि त्याने प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर नताशाचा होकार मिळवण्यात यश मिळवले. नताशाने नकार दिल्याची माहिती स्वतः वरुणनेच दिली आहे. वरुण धवनचा कुली नंबर वन आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण धवनने करीना कपूरसोबत ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ शोमध्ये भाग घेतला असताना नताशासोबतच्या प्रेमप्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. शोमध्ये बोलताना वरुणने सांगितले, मी रेड हाऊस आणि नताशा यलो हाऊसमध्ये होती. नताशाला सर्वप्रथम मी सहावीत असताना पाहिले होते. लंच ब्रेकमध्ये बास्केटबॉल कोर्टमध्ये येता-जाता मी तिला पाहात असे. बारावीपर्यंत माझी आणि नताशाची चांगली मैत्री झाली. माझे प्रपोजल स्वीकारण्यापूर्वी नताशाने तीन ते चार वेळा मला नकार दिला होता. नताशावर मी मनापासून प्रेम करीत असल्याने तिचा होकार मिळवायचाच या उद्देश्याने मी माझे प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर यात यश मिळवले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *