
धुळे : वारिस पठानच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
देशात वैमनस्य निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाणावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा – अनुप अग्रवाल.
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) हम पंधरा करोड आपके सौ करोड वे भारी है ! सिर्फ पंधरा मिनिट आपकी पुलिस हटादो” असे विधान करून देशात विध्वंस निर्माण करणारे व दोन धर्मियात तेठ निर्माण करून देशांची शांतता व सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या एम आय एम चा वारीस पठानांवर देशद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल करावा. जेणे करून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही.
आज भाजपा जिल्हा आघाडीच्यावतीने राजवाडे चौकात एम आय वारीस पठाण याचे प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध केला.लगेचच जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पुतळा पेटविण्यासाठी सुरुवात करते वेळीस शहर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील यांनी वेळीच प्रसंगावधान राखत हस्तक्षेप करत पुतळा दहन होऊ दिले. कार्यकर्त्यांकडून पुतळा हिसकावून घेतला.व जमा केला.यामुळे काहीवेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस हे सरकारच्या पाठीशी असल्याने असे कृत्य करते असा आरोपही यावेळी त्यांनी केला. वारिस पठाण यांचा निषेध करून निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
देशाची शांतता व सुरक्षितता बिघडवून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सध्या एम आय एम सारखा पक्षा कडून केला जात आहे. असिरुद्धीन औविसी यांच्या एका सभेतही एक मुलीने पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा दिल्यात. हे सर्व कसले द्योतक आहे. ! हे सर्व देश विघातच होय. यातून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
वरीस पठाणावर त्वरित कडक कारवाई व्हावी व त्याच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे.