पत्रकारांच्या कुटुंबियांचे लसीकरण -केंद्रावर लसीचा पुरवठाच नाही ; प्रशासनाचा ठेंगा

Featured जळगाव महाराष्ट्र
Share This:

जळगाव : येथील पत्रकारांचे लसीकरण शिबीर रविवारी ९ मार्च रोजी पार पडले. पत्रकारांच्या कुटुंबियांचे देखील लसीकरण व्हावे अशी मागणी होत असताना तीदेखील करण्यात येईल म्हणून पालकमंत्नी गुलाबराव पाटील यांनी अनुकूलता दर्शवली तर सोमवारी पत्रकारांच्या नातेवाईकांचे लसीकरण होईल असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात सोमवारी जेव्हा पत्रकार आले तेव्हा या ठिकाणी लसीचा साठा संपल्याने लसीकरण बंद असल्याचे बोर्ड दिसून आले. त्यामुळे काही पत्रकारांना कुटुंबियांसह मनःस्ताप सहन करावा लागला. पत्रकारांना प्रशासनाने ठेंगा दाखविला कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा ओरड झाल्यावर, सोशल मीडियात चर्चा सुरु झाल्यानंतर पत्रकारांचे लसीकरण अगदी घाईघाईत रविवारी उरकून टाकले. १६२ पत्रकारांना लाभ झाल्याचे प्रशासन सांगितले. तसेच आता पत्रकारांच्या कुटुंबियांना लसीकरण होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले. तर सोमवारी मेहता रुग्णालयाच्या केंद्रावर पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी वृत्तपत्राद्वारे केले.

जिल्हा प्रशासनाने यापूर्वी पोलिसांचे, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आणि वकिलांच्या कुटुंबियांचे लसीकरण करून दिले आहे. त्यानुषंगाने पत्रकारांच्या कुटुंबियांचेदेखील लसीकरण होईल म्हणून पत्रकार मंडळींमध्ये आनंद होता. मात्र सोमवारी काही पत्रकार तेथे लसीकरणाबाबत विचारायला गेले असता त्यांना लसीकरण बंद असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली. तसेच सकाळपासूनच लस आली नसल्याचे सांगितले. पत्रकारांना ऐन मे महिन्यात “एप्रिल फुल” केल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने पत्रकारांची थट्टा लावली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकशाहीचा चौथा खांब असूनही पत्रकारांसह पत्रकार संघटना जागृत नसल्याकारणाने प्रशासन पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले आहे. त्यामुळेच पत्रकारांची गंमत करणे प्रशासनाला जमत असल्याची चर्चा सुरु आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *