लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात करावी;आमदार चंद्रकांत पाटील

Featured जळगाव
Share This:

लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात करावी;आमदार चंद्रकांत पाटील.

रावेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास लेखी सूचना.

यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यात थोरगव्हाण,गाते, मस्कावद,घामोडी,तांदलवाडी, गहूखेडा,उधळी,ऐनपुर तसेच खिर्डी खु.,खिर्डी बु.येथे18ते45 वयोगटासाठी लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात करावी असे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
दि.6मे2021रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी रावेर यांना दिलेल्या पत्रात आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की शासनाने18ते45 वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण धोरण जाहीर केलेले आहे,त्यानुसार रावेर तालुक्यात पुरेसा उपलब्ध साठा नुसार आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र यावर लसीकरण केंद्र व्यापक स्वरुपात करण्यात यावे तसेच रावेर तालुक्यातील थोरगव्हाण,गाते,मस्कावद, घामोडी,तांदलवाडी,गहुखेडा, उधळी,खिर्डी बु.,ऐनपूर,खिर्डी बु. येथे उद्या लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण मोहीम व्यापक स्वरुपात करण्यात यावी तसेच लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन होईल याची पूर्णपणे काळजी घ्यावी असे सुद्धा दिलेल्या पत्रात आमदार चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले आहे या लेखी पत्राच्या प्रती माहितीसाठी जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *