उत्तर महाराष्ट्र देवस्थान समिति ने वाढविला मदतीचा हाथ

Featured नाशिक
Share This:

नाशिक (तेज समाचार डेस्क). सध्या संपूर्ण विश्व, संपूर्ण देश और आपला संपूर्ण महाराष्ट्र कोरोना वायरसच्या दुष्प्रभावाने वेखलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र सरकार ने संपूर्ण देशात संचारबंदी केली आहे. या संचार बंदी मुळे अनेक जण अशे आहे, ज्यांना आपल्या उदर निर्वाहाचा प्रश्न उद्भवला आहे. अशा लोकांना दोन्ही वेळेचे पर्याप्त अन्न मिळावे, या साठी अनेक संस्था आणि समाजसेवी पुढे येत आहे. या मध्येच आता उत्तर महाराष्ट्र देवस्थान समिति ने सुद्धा पुढाकार घेतला आहे.समिति द्वारे केली जाणारी ही मदत मुख्यमंत्री सहायत्ता निधीत करण्यात येते आहे.

लॉकडाऊन हेच ‘करोना’ला रोखण्यासाठी जालीम औषध असून, ही उपाययोजना राबविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. एकीकडे बुडणारा रोजगार तर दुसरीकडे करोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घेत प्रशासन आपले काम करीत आहे. अगदीच समाजातील काहींचा दररोजचा जेवणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील देवस्थानांनी आपापल्या पातळीवर व कार्यक्षेत्रात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मदाय आयुक्तांनी ही मदतीचे आवाहन केले आहे.

– भात खिचडीचे पॅकेट प्रशासनाच्या हवाले
मंदिर व्यवस्थापनांकडून होणा-या मदतीबाबात बोलताना श्री कपालेश्वर मंदिराचे ट्रस्टी अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी सांगितले कि, पैसा आणि अन्न वाटपाचा अजेंडा प्रमुख मंदिरांकडून राबविण्यात येतो आहे. कपालेश्वर मंदिर ट्रस्टने भात खिचडीचे 100 पॅकेट जिल्हा प्रशानसला दिले आहेत. त्यात दोन किलो तांदूळ, अर्धा किलो दाळ आणि तेल, मसाला अगदीच मीठही दिले. हे पॅकेट मिळणाऱ्या कुटुंबाला फक्त पाणी टाकून शिजवून घ्यावे लागणार आहे. या व्यतीरिक्त तीन लाख रूपयेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आले आहे.

– त्र्यंबकेश्वर देवस्थाने दिल 51 लाख
त्रंबकेश्वर देवस्थाने 51 लाख तर सप्तशृंगी निवासिनी देवस्थानने एकवीस लाख रुपये जाहीर केले आहेत. श्री काळाराम संस्थानने पाच लाख 55 हजार 555 इतकी रक्कम जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रात देवस्थान समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुर्दैवाने सध्या करोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. ही समिती अगदीच बाल्यअवस्थेत असली तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मदत करण्याची सुरूवात केली आहे.

– विविध देवस्थानांनी पण केली मदत
कालिका देवस्थानतर्फे एक लाखाचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष केशवराव पाटील यांनी दिली. तर, नवश्या गणपतीतर्फे एक लाखाची मदत देण्यात असल्याची राजू जाधव यांनी सांगितले आहे. देव मामलेदार संस्थांनीही एक लाख ५१ हजारची मदत केल्याची माहिती आप्पा बागड यांनी दिली. दक्षिण मुखी हनुमान मंदिरातर्फे शिवाजीराव गांगुर्डे यांनी एक लाखाची मदत घोषित केले. आहे. शनि महाराज देवस्थान नस्तनपुर यांच्यातर्फे एक लाखाची मदत देण्यात येणार आहे. गंभीरे यांच्या मते एक ते दीड कोटी रूपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *